विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : सुपरमॅन, द गूनीज आणि लीथल वेपन, फ्रेंचाईजी यासारख्या सुपरहिट आणि अभिजात चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे रिचर्ड डोनर (वय ९१) यांचे सोमवारी निधन झाले. याची माहिती त्यांची पत्नी लॉरेन शूलर डोनर यांनी दिली.Richrd Doner no more
सुपरमॅन सिनेमादवारे डोनर यांचे काम जगाच्या कानाकोपऱ्यात घराघरांत पोहोचले होते. रिचर्ड डोनर यांचा जन्म न्यूयॉर्क येथे १९३१ येथे झाला. प्रारंभी डोनर यांना अभिनेता व्हायचे होते. परंतु त्यांनी दिग्दर्शनाची वाट निवडली. त्यांनी आपल्या कारर्किदीची सुरवात टीव्ही शोने केली होती.
काल : हॉर्न-आक्रोश-7सेकंद थरकाप अन् ‘त्याची’ एंट्री ; आज : डॅशिंग-दबंग-सुपरमॅन टाळ्यांचा कडकडाट अन् ‘त्याची’ एंट्री
डोनर यांनी द रायफलमॅन, द ट्वाइलाइट झोन, गिलिगन्स आयलँड, पेरी मेसन यासारख्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे दिग्दर्शन केले. पंधरा वर्षानंतर त्यांना १९७६ मध्ये त्यांनी द ओमन या भयपटाने दिग्दर्शन केले आणि यात त्यांना घवघवीत यश मिळाले. १९८५ चा विनोदीपट ‘द गूयनीज’ च्या दिग्दर्शनाचेही त्यांचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App