जगातील दोन महासत्ताधिश पुतीन-बायडेन यांच्यात दहा वर्षांनी चर्चा


विशेष प्रतिनिधी

जीनिव्हा – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्यात जीनिव्हा येथे भेट झाली. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्या उपस्थितीत बायडेन आणि पुतीन यांची भेट झाली. या दोघांमध्ये दहा वर्षांनंतर भेट होत आहे. यापूर्वी पुतीन हे रशियाचे पंतप्रधान असताना आणि बायडेन हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना दोघांची भेट झाली होती. Putin – Biden meet after 10 years

आजच्या बैठकीत सायबर हल्ले, मानवाधिकारांचा भंग आणि इतर अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. या चर्चेतून फारसे काही निष्पन्न होण्याची दोन्ही देशांना अपेक्षा नाही. मात्र, तणाव कमी करण्यास ही भेट उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.



एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी, व्यापार निर्बंध, निवडणुकीमध्ये हस्तक्षेपाचा आरोप, हेरगिरीचा आणि सायबर हल्ल्यांचा आरोप, युक्रेनमधील वाद अशा विविध मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीतील निष्कर्षाकडे सर्व जगाचे लक्ष आहे.

Putin – Biden meet after 10 years

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात