श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलचे संकट : फक्त 5 दिवसांचे इंधन शिल्लक, भारताकडून क्रेडिट लाइन न मिळाल्यास संकट आणखी गडद


वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेत फक्त पाच दिवस पेट्रोल आणि डिझेल शिल्लक आहे. ऊर्जामंत्र्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. भारताकडून नवीन 500 मिलियन डॉलरचे क्रेडिट न मिळाल्यास, संकट आणखी गडद होईल. 22 मिलियन लोकसंख्येचा देश सात दशकांतील सर्वात वाईट आर्थिक संकटाशी झुंजत आहे. त्यांचा परकीय चलनाचा साठा संपला आहे आणि अन्न, औषध आणि इंधनासह आवश्यक आयातीसाठी डॉलर नाहीत.Petrol-diesel crisis in Sri Lanka 5 days fuel balance, crisis worsens without credit line from India

इंधनासाठी रात्रभर रांगा

देशभरातील अनेक इंधन केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल, डिझेलसाठी नागरिकांना रात्रभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे देशात निदर्शनेही होत आहेत. महिनाभरापूर्वीही श्रीलंकेत इंधनाचे संकट आले होते. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, देशात फक्त एक दिवसाचे इंधन शिल्लक आहे. ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा म्हणाले की, देशाने पुरवठादारांना 725 मिलियन डॉलरची थकीत देयके दिली आहेत.



साठा वेगाने संपतोय

“परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे इंधन पुरवठ्यात समस्या निर्माण होत आहेत. 21 जूनपर्यंत सध्याचा साठा व्यवस्थापित करण्यासाठी सरकार काम करत आहे. मागणी पूर्ण करणे खूप कठीण होत आहे आणि अनावश्यक प्रवास कमी केला नाही आणि साठेबाजी थांबवली नाही तर स्टॉक लवकर संपू शकतो. आम्ही पुढील तीन दिवसांत पेट्रोलची शिपमेंट आणि पुढील आठ दिवसांत आणखी दोन शिपमेंट्सची अपेक्षा करत आहोत.”

भारताच्या क्रेडिट लाइनची प्रतीक्षा

श्रीलंका भारत सरकारच्या एक्झिम बँकेकडून 500 मिलियन डॉलर क्रेडिट लाइनला हिरवा कंदील मिळण्याची वाट पाहत आहे. पुढील काही आठवड्यांत ते इंधन शिपमेंटसाठी वापरले जाईल असे विजेरांनी सांगितले. यापूर्वी भारताने सुमारे 3 अब्ज डॉलरची मदत दिली आहे. यामध्ये अत्यावश्यक आयातीसाठी 1 अब्ज डॉलरची क्रेडिट लाइन आणि 400 मिलियन डॉलरचा स्वॅप समाविष्ट आहे.

Petrol-diesel crisis in Sri Lanka 5 days fuel balance, crisis worsens without credit line from India

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात