Oxfam Report : ऑक्सफॅमचा धक्कादायक अहवाल, जगात दर मिनिटाला 11 जणांचा उपासमारीमुळे मृत्यू

Oxfam Report Claims 11 people dies Every Minute of hunger around the world

Oxfam Report : ऑक्सफॅमने म्हटले आहे की, जगात दर मिनिटाला 11 जणांचा उपासमारीने मृत्यू होतो याशिवाय जगभरात दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत सहापट वाढली आहे. ‘द हंगर व्हायरस मल्टिप्लाइज’ नावाच्या अहवालात म्हटलंय की, दुष्काळामुळे मृतांचा आकडा कोविड-19च्या तुलनेत जास्त आहे, ज्यामुळे दर मिनिटाला सुमारे सात जणांचा बळी जातो. Oxfam Report Claims 11 people dies Every Minute of hunger around the world


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑक्सफॅमने म्हटले आहे की, जगात दर मिनिटाला 11 जणांचा उपासमारीने मृत्यू होतो याशिवाय जगभरात दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत सहापट वाढली आहे. ‘द हंगर व्हायरस मल्टिप्लाइज’ नावाच्या अहवालात म्हटलंय की, दुष्काळामुळे मृतांचा आकडा कोविड-19च्या तुलनेत जास्त आहे, ज्यामुळे दर मिनिटाला सुमारे सात जणांचा बळी जातो.

दर मिनिटाला 11 भूकबळी

ऑक्सफॅम अमेरिकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅबी मॅक्समॅन म्हणाले की, “ही आकडेवारी धक्कादायक आहे, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही संख्या अकल्पित दु:ख सहन करणार्‍या लोकांची आहे. यात अगदी एक व्यक्तीही खूप जास्त आहे.” पुढे असेही म्हटले आहे की, जगातील 155 मिलियन लोक आता अन्न-असुरक्षिततेच्या पातळीवर जगत आहेत किंवा गतवर्षाच्या तुलनेत 20 मिलियन जास्त आहेत. त्यापैकी दोन तृतीयांश जणांना उपासमारीचा सामना करावा लागतोय, कारण त्यांचा देश सैनिकी संघर्षात आहे. मॅक्समॅन म्हणाले, “आज कोविड-19 मुळे आर्थिक घसरण होऊन तसेच वाढत्या हवामान बदलाच्या संकटामुळे 5 लाख 20 हजारांहून अधिक जणांना उपासमारीच्या मार्गावर आणले आहे.

ऑक्सफॅम अहवालातील महत्त्वपूर्ण खुलासा

महामारीशी लढण्याऐवजी युद्धरत पक्षांनी एकमेकांशी युद्धच केले. महामारी असूनही ऑक्सफॅमचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सैन्य खर्च वाढून महामारीदरम्यान 51 बिलियन डॉलरची वाढ झाली. रिपोर्टमध्ये अफगाणिस्तान, इथिओपिया, दक्षिण सुदान, सिरिया आणि यमनसहित अनेक देशांना सर्वात वाईट उपासमारीच्या हॉटस्पॉटमध्ये सूचिबद्ध करण्यात आले आहे.

मॅक्समॅन म्हणाले, “भूकेला शस्त्र म्हणून वापरले जात आहे, लोक अन्न व पाण्यापासून वंचित आहेत आणि मानवी मदत कार्यात बाधा आणली जात आहे. लोक सुखरूप राहू शकत नाहीत किंवा अन्न शोधू शकत नाहीत.” त्यांच्या बाजारपेठांवर बॉम्बस्फोट होत आहेत आणि पिके व पशुधन नष्ट झाले आहे, संघटनेने सरकारांना ‘विनाशकारी भूक’ निर्माण करण्यापासून रोखण्याचा आग्रह केला आणि त्यांना मदत कार्यात सामील होण्याचे आवाहन केले.

Oxfam Report Claims 11 people dies Every Minute of hunger around the world

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात