विशेष प्रतिनिधी
ढाका : कट्टर इस्लामवाद्यांनी विरोध केल्यामुळे केवळ महिलांसाठी बीचची कल्पना काही तासांतच रद्द करण्यात आली. बांग्ला देशात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.बांग्लादेशातील महिलांनी स्वत:साठी वेगळा बीच असल्याची मागणी केली होती.Opposition from hardline Islamists, the idea of a beach for women only was scrapped within hours
त्यामुळे महिला आणि मुलांसाठी कॉक्स बाजारचा १५० मीटर (४९२ फूट) बीच उघडला होता. परंतु काही तासांनंतर त्यांनी ही कल्पना रद्द करत असल्याचे जाहीर केले.बांग्लादेश हा मुस्लीमबहुल आणि पुराणमतवादी देश आहे.
त्यामुळे महिलांनी स्वत:साठी वेगळ्या राखीव समुद्रकिनारा विभागाची विनंती केली, कारण त्यांना गर्दीच्या ठिकाणी अवघडल्यासारखं आणि असुरक्षित वाटत होते. त्यानुसार राखीव समुद्रकिनाऱ्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, कट्टर इस्लामवाद्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द केला. मात्र, यामुळे बांग्ला देश सरकारवर टीका होत आहे. सरकार इस्लामवाद्यांसमोर झुकल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बांग्लादेशातील कॉक्स बाजार हा जगातील सर्वात लांब नैसर्गिक समुद्र किनारा आणि देशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सणासुदीच्या काळात लाखो लोक या भागाला भेट देतात आणि अलिकडच्या वर्षांत पर्यटन क्षेत्राने भरभराट केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App