जर्मनीचे नवे चॅन्सलर म्हणून ओलाफ शोल्झ यांची निवड


विशेष प्रतिनिधी

बर्लिन – ग्रीन पार्टी आणि फ्रि डेमोक्रॅट्‌स या पक्षांनी पाठिंबा दिल्याने सोशल डेमोक्रॅट्‌स पक्षाचे नेते ओलाफ शोल्झ जर्मनीचे चॅन्सलर म्हणून निवडून आले. दुसऱ्या महायुद्धानंतरचे ते नववे चॅन्सलर आहेत. सोळा वर्षे जर्मनीचे समर्थपणे नेतृत्व केलेल्या अँजेला मर्केल यांची कारकिर्द यामुळे अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे.Olaf Sholj became New chancellor of Germany

संसदेत मतदान झाले त्यावेळी आता सदस्य नसलेल्या मर्केल या प्रेक्षकांसाठीच्या गॅलरीत बसल्या होत्या. संसदेचे सत्र संपताना सर्व सदस्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. शोल्झ यांच्यासमोर कोरोना संसर्गस्थिती, पर्यावरण बदल आणि जर्मनीला युरोपात आघाडीवर ठेवणे अशी आव्हाने आहेत.तसेच, सरकार स्थापनेसाठी आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात असणारे पक्ष एकत्र आल्याने त्यांना सांभाळून घेण्याचेही शोल्झ यांच्यासमोर आव्हान आहे.सरकार स्थापनेसाठी सोशल डेमोक्रॅट्‌स पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यास इतर दोन पक्षांनी मान्यता दिल्याने ओलाफ शोल्झ यांच्याकडे संसदेत बहुमत मिळण्याइतपत मते निश्चि्त झाली होती.

आज ३९५ विरुद्ध ३०३ मतांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मतदानात विजय झाल्यावर देशाच्या अध्यक्षांनी त्यांचे नाव चॅन्सलर पदासाठी सुचविले. यानंतर त्यांचा शपथविधी झाला. शोल्झ हे २०१८ पासून जर्मनीचे उप चॅन्सलर आणि अर्थमंत्री होते. त्यामुळे सरकार चालविण्याचा त्यांना अनुभव आहे.

Olaf Sholj became New chancellor of Germany

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था