उत्तर कोरियाच्या नागरिकांना अन्नधान्याची मोठी टंचाई, अमेरिकेपुढे झुकण्यास किम जोंग उन यांचा नकार


विशेष प्रतिनिधी

सोल – कोरोना संसर्गाच्या काळात उत्तर कोरियामधील नागरिकांना अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवत असून त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असे अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शेरमन यांनी म्हटले आहे.North koriya facing food shortage

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वीच देशातील अन्नटंचाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. तरीही, अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.



आपल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी येथील सरकारने लवकरात लवकर त्यांच्या अणुकार्यक्रमावरील चर्चेला तयार व्हावे, असे आवाहनही शेरमन यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना शेरमन म्हणाल्या की,‘उत्तर कोरियाच्या नागरिकांची आम्हाला काळजी वाटत आहे. कोरोना आणि अन्नटंचाई अशी दोन संकटांना त्यांना सामना करावा लागत आहे. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उत्तर कोरिया सरकारने अण्वस्त्र कार्यक्रम बंद करून शांतता चर्चा करावी.’

North koriya facing food shortage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात