Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो Annie Ernaux यांना साहित्यातील नोबेल जाहीर


वृत्तसंस्था

पॅरिस : जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो Annie Ernaux यांना जाहीर करण्यात आला आहे. अ‍ॅनी अर्नो यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे. त्यांनी साहित्यातून सामाजिक बंधनांच्या पलिकडे जाऊन जीवनाचा गाभा शोधणारे लेखन केल्याने त्यांना या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Nobel Prize in Literature awarded to French author Annie Ernaux

अर्नो यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्या फ्रेंच लेखिका आणि साहित्य विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांचे साहित्यिक काम बहुतेक आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे. अर्नो त्यांच्या वैयक्तिक जीवनाची ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने त्या भागाचा त्यांच्या साहित्यात याचा प्रभाव दिसून येतो. अ‍ॅनी
अर्नो यांनी १९७४ मधील Les Armoires vides या आत्मचरित्रपर कांदबरीद्वारे साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली, तर १९८४ मध्ये त्यांना La Place या कादंबरीसाठी रेनॉडॉट पुरस्कारही मिळाला होता.

गेल्या वर्षीचा नोबेल साहित्य पुरस्कार टांझानियामध्ये जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले लेखक अब्दुल राझक गुरनाह यांना जाहीर करण्यात आला होता. त्यांच्या कादंबरीत व्यक्ती आणि समाजांवर स्थलांतराच्या परिणामावर भाष्य करणारे साहित्य होते.

नोबेल समितीकडून यासाठी गौरव

Nobel Prize in Literature awarded to French author Annie Ernaux “for the courage and clinical acuity with which she uncovers the roots, estrangements and collective restraints of personal memory”, असे नोबेल समितीने स्पष्ट केले आहे.

Nobel Prize in Literature awarded to French author Annie Ernaux

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय