नासा चंद्रावरील मातीपासूनच बनविणार बांधकाम साहित्य, पृथ्वीवरून कच्चा माले नेण्याचा अफाट खर्च वाचणार


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – चंद्रावरील घटकांचे परीक्षण करण्यासाठी ‘नासा’च्या अभियंत्यांनी ‘नॉरर्थ्रोप ग्रुमम सिग्नस या मालवाहू यानातून थ्रीडी प्रिंटर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठविले आहे. या प्रिंटरच्या साहाय्याने घनपदार्थ तयार करण्यासाठी चंद्रावरील मातीचा वापर करण्याहत येणार आहे.NASA sent 3 D printer on moon

पृथ्वीबाहेर मानवाच्यार कायम निवासासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर शाश्वरत उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी थ्रीडी प्रिंटिंगचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असेल. पुढील काळात हे तंत्रज्ञान उपयुक्त असेल, अशी अपेक्षा आहे.



या ठिकाणी निवासी वसाहत, विमानतळ आणि आगामी काळातील शोधमोहिमांसाठी कच्चा माल पृथ्वीवरून आणण्यापेक्षा जागेवर तयार करण्याच्या कामात या प्रिंटरचा वापर होऊ शकतो.‘युनिव्हर्स टुडे’च्या वृत्तानुसार चंद्रावर बांधकाम करण्यासाठी अवजड साहित्य पृथ्वीवरून वाहून आणण्याऐवजी चंद्रावरच ते तयार स्वरूपात मिळण्यासाठी ‘रेडवायर रिगोलिथ प्रिंट’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

याचा एक भाग म्हणून थ्रीडी प्रिंटर ‘आयएसएस’वर पाठविला आहे. चंद्रावर तातडीच्या बांधकामासाठी तेथील पृष्ठभागावर सापडणारी माती, तुटलेले दगड आणि अन्य घटकांचा (रेगोलिथ) वापर करण्यास ‘आरआरपी’ सक्षम करण्यात आले आहे. ‘मेड इन स्पेस मॅन्युफॅक्चरिंग डिव्हाइस’ (मॅनडी)च्या सहकार्याने हा प्रकल्प आखला आहे.

NASA sent 3 D printer on moon

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात