नॅन्सी पेलोसींची तैवान भेट आणि चीनची घसरती (धमकीयुक्त बोलघेवडी) भूमिका!!

विनायक ढेरे

अमेरिकन संस्थेच्या प्रतिनिधी गृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी आज 3 ऑगस्ट 2022 रोजी आपली तैवान भेट यशस्वीरित्या पूर्ण करून त्या दक्षिण कोरियाला रवाना झाल्या… पण दरम्यानच्या काळामध्ये शी जिनपिंग यांच्या चिनी कम्युनिस्ट राजवटीने जेवढी शाब्दिक आदळआपट केली आणि धमकीयुक्त लष्करी हालचाल केली त्याचा फारसा परिणाम अमेरिकेच्या तैवान विषयक भूमिकेवर झालेला दिसला नाही किंबहुना चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर तैवानच्या बाबतीत नुसता बोलघेवडा देश ठरल्याची बाब मात्र ठळकपणे अधोरेखित झाली!! Nancy Pelosi’s Taiwan visit and xi jjngping’s communist regime’s receding foreign policy

कारण जेव्हा नॅन्सी पेलोसी यांनी आपली तैवान भेट जाहीर केली होती तेव्हा त्या भेटीला ठामपणे विरोध करून शी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट राजवटीने सरळ सरळ तैवानशी युद्ध करण्याची धमकी दिली होती. नॅन्सी पेलोसी यांची तैवान भेट पूर्णपणे रोखण्याचाच चीनचा इरादा होता. परंतु चीन त्या इराद्यांमध्ये सफल होऊ शकला नाही.

मग चीनने आपली युद्धाची भाषा बदलली. आम्ही तैवानच्या सामुद्रधुनीत लढाऊ जहाजे, विमाने पाठवू आणि तैवानवर आक्रमण करू. तैवानला धडा शिकवू, अशी भाषा अशी जिंगपिंग यांच्या कम्युनिस्ट राजवटीने सुरू केली. पण बायडेन प्रशासनाने आणि नॅन्सी पेलोसी यांनी त्या भाषेलाही फारसे महत्त्व दिले नाही.

नॅन्सी पेलोसी या तैवानच्या भूमीवर अमेरिकेची 24 लढाऊ विमाने घेऊन उतरल्या. चीनने लष्करी पातळीवर काही हालचाली जरूर केल्या पण त्या धमक्यायुक्त हालचालींपेक्षा फारशा पलिकडच्या नव्हत्या!! तैवाननेही आपल्या कुवतीनुसार या धमकीयुक्त हालचालींना प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवली.

 चिनी राजदूतांची आक्रमक प्रेस रिलीज

आंतरराष्ट्रीय पातळीवर जपान, भारत, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यामधील चिनी राजदूतांनी नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीविरोधात आक्रमक भाषेत प्रेस रिलीज काढली. त्यांची तैवान भेट “वन चायना” पॉलिसीच्या विरोधात मानली जाईल आणि तैवानला अमेरिका स्वातंत्र्यासाठी फूस देते असे मानले जाईल. हे चिनी कम्युनिस्ट राजवट सहन करणार नाही, अशी भाषा राजदूतांच्या प्रेस रिलीज मध्ये होती. तरी देखील नॅन्सी पेलोसी यांनी तैवान मधल्या तीन कार्यक्रमांमध्ये लोकशाही वाचविण्यासाठी तैवानला अमेरिका पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेने शाब्दिक पाठिंबा आणि काही प्रमाणात शस्त्रास्त्रांचा पाठिंबा देऊन जी मूलभूत तैवानविषयीची संदिग्ध भूमिका आहे, ती तशीच कायम ठेवली. पण चीनच्या धमक्यांना मात्र आपण भीक घालत नाही हे ठळकपणे दाखवून दिले!! कारण नॅन्सी पेलोसी या तैवानच्या भूमीवर असताना तैवानची हवाई हद्द ओलांडणे या पलिकडे चिनी विमानांनी फारसे काही केले नाही. मूळात जी युद्धाची भाषा होती ती नंतर मवाळच होत गेलेली दिसली.

युद्धाची वातावरण निर्मिती

चीन मधल्या शी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट राजवटीने सुरुवातीला वातावरण निर्मिती तर महायुद्ध सुरू करण्याची केली होती. पण नुसती वातावरण निर्मिती करून आंतरराष्ट्रीय राजकारण साधता येत नाही हे फक्त अमेरिकेच्याच बाबतीत नव्हे, तर गलवान संघर्षात भारताच्या बाबतीतही दिसून आले आहे. गलवान संघर्षात भारताने चीनवर अक्षरशः शारीरिक युद्धात संपूर्ण मात केली. चिनी सैनिकांनी 20 भारतीय सैनिक मारल्यावर भारतीय सैनिकांनी 42 चिनी सैनिक मारून बदला घेतला. त्यानंतरही लडाखमध्ये चिनी लष्कराने धमकीयुक्त हालचाली केल्या पण या पलिकडे चिनी लष्कर काही करू शकले नाही.

शी जिंगपिंगची बोलघेवडी राजवट

नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीच्या तशाच धमकीयुक्त हालचाली चीनने केल्या. चिनी लष्कराचा संख्यात्मक बोलबाला जेवढा आहे, तेवढी त्याची क्षमता नसल्याचे एअर मार्शल भूषण गोखले यांच्यासह अनेक लष्करी तज्ञ सांगतात. भूषण गोखले भारताच्या हवाई दलाचे उपप्रमुख राहिले आहेत. त्यांच्याच वक्तव्याचे प्रत्यंतर नॅन्सी पेलोसी यांची तैवान भेट आणि या भेटीच्या वेळी चिनी कम्युनिस्ट राजवटीची राजवटीचा प्रतिसाद यातून जगाला दिसून आले आहे. शी जिंगपिंग यांची कम्युनिस्ट राजवट आंतरराष्ट्रीय पातळीवर दिवसेंदिवस नुसती बोलघेवडी ठरून एक्सपोज होताना दिसत आहे!!

Nancy Pelosi’s Taiwan visit and xi jjngping’s communist regime’s receding foreign policy

महत्वाच्या बातम्या