विशेष प्रतिनिधी
लंडन : युरोपात कोरोनाचा कहर सुरूच असून येत्या सहा ते आठ आठवड्यांत ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण होऊ शकते, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.More than half of Europe’s population will be have cotona infected, the World Health Organization fears
जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपियन प्रादेशिक संचालक डॉ. हंस क्लुगे यांनी मंगळवारी डेन्मार्कमध्ये पत्रकारांना सांगितले की 2022 च्या पहिल्या आठवड्यात युरोपियन प्रदेशात कोविड -19 चे सत्तर लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
10 जानेवारीपर्यंत युरोपमधील 26 देशांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी एक टक्यांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. क्लुगे म्हणाले, ओमिक्रॉन वेगाने पसरत असल्याने त्याचा अनेक देशांमध्ये प्रसार वढत आहे. त्यामुळे या देशांतील आरोग्य यंत्रणा टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकांना आरोग्य सेवा पुकारण्याचे आव्हान आहे.
कोरोना प्रतिबंधक लस ओमिक्रॉन विरूद्ध चांगले संरक्षण प्रदान करत आहेत. ओमिक्रॉन वाढत असलेल्या देशांमध्ये आरोग्य यंत्रणा पुरेशा क्षमतेने काम करतील याची काळजी घ्यायला हवी. कोरोना बाधितांना विलगिकरणात ठेवायला हवे. त्याचबरोबर जास्तीत जास्त चाचण्या करायला हव्यात.
ओमिक्रॉन डेल्टा व्हायरसपेक्षा कमी गंभीर असला तरी सौम्य नाही असेही जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App