भारत, युरोपातील अफगाण विद्यार्थ्यांना अफगाणिस्तानातील भयावह परिस्थितीची चिंता; कुटुंबीयांशी संपर्कच नाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत आणि युरोपातील अफगाण विद्यार्थ्यांना अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपले कुटुंबीय नेमके कोठे आहेत याची काहीही माहिती नाही. कारण त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क तुटला आहे.Afghan diaspora in Manchester, United Kingdom and Vienna, Austria held protests against Pakistan for supporting terrorism in Afghanistan

युरोपातील देशांमध्ये अफगाण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. लोकशाहीप्रेमी नागरिकांचे लक्ष अफगाणिस्तानातील चिंताजनक परिस्थितीकडे वेधले आहे. ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्नामध्ये तसेच ब्रिटनमध्ये मॅंचेस्टर येथे अफगाण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली आहेत.नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणारे अफगाण विद्यार्थीदेखील तालिबानी राजवटीचा अत्याचारामुळे चिंतेत असून त्यांना त्यांच्या कुटुंबांची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. असगर अली हा अफगाणिस्तानमधील बामियान प्रांतातला रहिवासी आहे. तो तिथल्या अल्पसंख्यांक समाजामधील आहे. बामियान प्रांत तालिबान्यांच्या कब्जात गेल्यामुळे तो चिंतेत आहे. हाच तो बामियान प्रांत आहे, जिथे महात्मा गौतम बुद्धाच्या सर्वात उंच मूर्ती दगडात कोरलेल्या होत्या.

तालिबानच्या आधीच्या राजवटीत धर्मांध सत्ताधाऱ्यांनी तोफा लावून या मूर्ती फोडल्या आहेत. असगर अली याच बामियान प्रांतातला रहिवासी आहे. मला माझे कुटुंबीय नेमके कोठे आहेत याची माहिती नाही. त्यांच्याशी माझा गेल्या महिनाभरात संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती त्याने पत्रकारांना दिली आहे.

जलालुद्दीन हा अफगाणिस्तानातल्या दुसरा विद्यार्थीही जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकतो. त्याने भारतात आपल्याला रहिवासाचा दाखला, व्हिसा देऊन मुदत वाढवावी. अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे. अफगाणिस्तानात आत्ता तिथे जाण्यास अतिशय धोकादायक आहे. तिथली नेमकी परिस्थिती समजायला मार्ग नाही. मीडियातून आणि सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या पूर्ण तथ्यही नाहीत. परंतु, स्थानिक पातळीवरची वस्तुस्थिती खूप भिन्न असू शकते याचा अनुभव आम्ही अफगाणिस्तानात असताना घेतला आहे, अशी माहिती जलालुद्दीन यांनी दिली आहे.

हे सर्व विद्यार्थी अफगाणिस्तानातून तीन-चार वर्षांपूर्वी बाहेर पडून वेगवेगळ्या देशांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे लोकशाही देशांमधल्या वातावरणाची त्यांना सवय झाली आहे या पार्श्‍वभूमीवर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करणे याचा नेमका अर्थ त्यांना समजतो आहे. त्यातूनच त्यांची चिंता अधिक वाढली आहे.

हे विद्यार्थी आपापल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. परंतु, तालिबानने सगळी संपर्क यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्याने त्याचबरोबर एकूणच अफगाणिस्तानातील संपर्क यंत्रणेची गुणवत्ता कमी असल्याने या विद्यार्थ्यांचा आपल्या कुटुंबियांशी गेल्या काही महिन्यांपासून संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

Afghan diaspora in Manchester, United Kingdom and Vienna, Austria held protests against Pakistan for supporting terrorism in Afghanistan

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती