Major Road Accident In Pakistan Punjab Province : सोमवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बस-ट्रकच्या धडकेत 30 प्रवासी ठार झाले. यामध्ये महिला आणि मुलांचादेखील समावेश आहे. या भीषण अपघतात 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुझफ्फरगडमधील डेरा गाझी खानजवळ तनुसा रोडवर हा अपघात झाला. Major Road Accident In Pakistan Punjab Province 30 Killed After Bus Collided With Truck
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : सोमवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बस-ट्रकच्या धडकेत 30 प्रवासी ठार झाले. यामध्ये महिला आणि मुलांचादेखील समावेश आहे. या भीषण अपघतात 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुझफ्फरगडमधील डेरा गाझी खानजवळ तनुसा रोडवर हा अपघात झाला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, बस भरधाव वेगात होती. जिल्हा आपत्कालीन अधिकारी डॉ. नय्यर आलम यांनी सांगितले की, बसमध्ये 75 प्रवासी होते. त्यातील बहुतेक मजूर होते, जे ईदच्या उत्सवातील सुटीसाठी घरी जात होते. बस सियालकोटहून राजनपूरकडे जात होती. एरिया कमिश्नर डॉ. इरशाद अहमद म्हणाले की, मदत व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतांचे आणि जखमींचे मृतदेह डेरा गाझी खान परिसरातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी म्हटले की, ते या दुर्घटनेवर नजर ठेवून आहेत. प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Major Road Accident In Pakistan Punjab Province 30 Killed After Bus Collided With Truck
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App