ज्वालामुखीने ओकला तीन मजली इमारती एवढ्या उंचीचा ‘लावा’ चा फवारा ; स्पेनच्या बेटावर ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक


वृत्तसंस्था

माद्रिद : स्पेन देशातील एक बेटावर ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीतून उद्रेक झालेल्या लावाचा फवारा एका तीन मजली इमारतीच्या उंची एवढा होता. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.
lava fountain as high as three-story buildings; Volcano erupts again on the Spanish island

स्पेनच्या ‘ला पालमा’ बेटावर ‘कुंब्रे व्हीजा’ हा ज्वालामुखी जागृत झाला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून तो धूळ, आग आणि लावा ओकत आहे. त्यामुळे बेटावरील अनेकांना अन्यत्र स्थलांतरीत केले आहे. आता ज्वालामुखी अधिकच दाहक झाला असून तो लावा मोठ्या प्रमाणात फेकत आहे. एक तीन मजली इमारतीच्या उंची एवढी लावाची भिंत ज्वालामुखीच्या तोंडातून बाहेर पडत असल्याचे दृश्य प्रसिद्ध झाल्याने नागरिकामध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबरच भूकंपाचे २१ झटके या भागाला बसले आहेत. रविवारी ३.८ रिशटर स्केलचा धक्का बसला. भूकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ८३ हजार लोकसंख्या असलेल्या या बेटावरील ६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

lava fountain as high as three-story buildings; Volcano erupts again on the Spanish island

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर