महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढणाऱ्या व्यंगचित्रकार लार्स विल्क्स यांचा अपघातात संशयास्पद मृत्यू


वृत्तसंस्था

स्टॉकहोम : महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विलक्स यांचा कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची कार समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकला धडकली. कारने पेट घेतला आणि त्यात लार्स यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत त्यांच्या दोन सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.Lars Vilks: Muhammad cartoonist killed in traffic collision

सकृत दर्शनी हा अपघात वाटत असला तरी त्या मागची नेमकी कारणे शोधून काढण्यात येतील असे स्वीडिश पोलिसांनी स्पष्ट केले आहे.महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढल्यानंतर लार्स यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. कट्टर मुस्लिम संघटनांनी त्यांच्या विरोधात मारण्याचे फतवे काढले होते. त्यानंतर स्वीडिश सरकारने त्यांना पोलिस संरक्षण दिले होते.


आज झालेल्या अपघातात त्यांची कार समोरून येणाऱ्या ट्रक वर धडकल्याचे सांगण्यात येते. कारने पेट घेतला. यामध्ये ट्रकचालकाचाही मृत्यू झाला. त्यामुळे संशय वाढला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून यामागे कोणता घातपात नाही ना, याचा तपास करण्यात येईल, असे स्वीडिश पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

Lars Vilks: Muhammad cartoonist killed in traffic collision

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात