सततच्या युध्दसदृश परिस्थितीमुळे कायमच ज्वालामुखीच्या तोंडावर असल्यासारख्या इस्त्रायलने स्वत:भोवती अदृश्य कवच उभारले आहे. आयर्न डोम या डिफेन्स सिस्टीमने हमास या दहशतवादी गटाने सोडलेली सर्व क्षेपणास्त्रे निष्प्रभ करून नागरिकांना सुरक्षित ठेवले आहे.Invisible shield around Israel, Iron Dome obscures Hamas missiles
प्रतिनिधी
तेल अव्हिव : सततच्या युध्दसदृश परिस्थितीमुळे कायमच ज्वालामुखीच्या तोंडावर असल्यासारख्या इस्त्रायलने स्वत:भोवती अदृश्य कवच उभारले आहे. आयर्न डोम या डिफेन्स सिस्टीमने हमास या दहशतवादी गटाने सोडलेली सर्व क्षेपणास्त्रे निष्प्रभ करून नागरिकांना सुरक्षित ठेवले आहे.
आयर्न डोमची जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्समध्ये गणना होते. इस्रायल सरकारची संरक्षण संस्था राफेल अॅडव्हान्सड डिफेन्स सिस्टीम आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने आयर्न डोम विकसित केले आहे.
यामध्ये रॉकेट, तोफखाने, मोर्टार नष्ट करण्यासाठी खास डिझाइन केले आहे. आयर्न डोम कोणत्याही हवामानात काम करू शकते. इस्रायलने पहिल्यांदा वर्ष २०१२ मध्ये याचा समावेश ताफ्यात केला होता. रडारच्या माध्यमातून शत्रूंकडून येणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट्स ओळखली जातात आणि हवेतच ती नेस्तानाबूत केली जातात.
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये रॉकेट हल्ले सुरू आहेत. पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टी शहरात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सशस्त्र गट हमासला मोठा धक्का बसला आहे.
इस्रायलच्या कारवाईत हमासचे ११ कमांडर ठार झाले आहेत. तर, पॅलेस्टाइनचे ७० जण ठार झाले असल्याचे म्हटले जात आहे. हमासकडून होणारे रॉकेट हल्ले इस्रायलने निष्प्रभ केले आहे.
इस्रायलच्या सुरक्षा दलाने कारवाई केल्यानंतर पॅलेस्टाइनमधील सशस्त्र संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले. हमासने मागील तीन दिवसात इस्रायलवर जवळपास १२०० हून अधिक रॉकेट हल्ले केले असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे.
हमासने इस्रायलवर एवढ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यासाठी इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने मोठी निर्णायक भूमिका बजावली. आयर्न डोमने हमासचे बहुतांशी रॉकेट हवेतच हाणून पाडली. आयर्न डोम ही एअर डिफेन्स सिस्टिम आहे.
आयर्न डोम शत्रुच्या क्षेपणास्त्राचा हवेत वेध घेतो. शत्रुने एकाच वेळी अनेक रॉकेट, क्षेपणास्त्र डागली तरी आयर्न डोम त्यातील जवळपास ९५ ते १०० टक्के रॉकेट्स, क्षेपणास्त्रांचा वेध घेतो.
त्यामुळे हवेत नष्ट झालेल्या रॉकेट, क्षेपणास्त्रांचे अवशेष जमिनीवर कोसळतात आणि नुकसान कमी होते. आयर्न डोम मोबाइल लाँचर ट्रकच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात. आयर्न डोमच्या या वैशिष्ट्यामुळे हमासने केलेले रॉकेट हल्ले निष्प्रभ ठरले.
आयर्न डोम अमेरिकेच्या आर्थिक व तांत्रिक मदतीने २०११ मध्ये सक्रिय झाले होते. आयर्न डोम फायटर प्लेनमधून डागली जाणारी क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा निशाणा साधू शकते. या आयर्न डोमचा सक्सेस रेट ८० ते ९०% आहे. तज्ज्ञांनुसार, हे १००% विश्वासार्ह नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App