विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : आपला कोणताही लष्करी तळ किंवा प्रांताचा वापर अमेरिकेला अजिबात करू दिला जाणार नाही. पाकिस्तानच्या प्रांतातून अफगाणिस्तानमध्ये कोणतीही कारवाई होऊ दिली जाण्याची शक्यता अजिबात नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. चीनच्या जवळ गेलेल्या पाकिस्तानने अमेरिकेला एकप्रकारे हा इशारा दिल्याचे मानले जाते.Imran Khan’s hollow warning to US for financial help
काही तज्ञांच्या मते अमेरिकेकडून प्रचंड आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी इम्रान खान यांनी ही चाल खेळली आहे. दहशतवादाच्या मुकाबल्याच्या नावाखाली आतापर्यच पाकिस्तानने लाखो डॉलर्सची आर्थिक मदत अमेरिकेकडून घेतली आहे. त्यांचा हा इशारा पोकळ आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेण्यास सुरवात केली आहे. ती लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, मात्र त्यानंतरही युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील दहशतवादावावर अंकुश ठेवण्याचे अमेरिकेचे धोरण आहे.
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार या विभागात अमेरिकेचे लष्करी तळ स्थापण्यासाठीच्या वाटाघाटी सध्या ठप्प झाल्या आहेत. काही अधिकाऱ्यांनी तसे म्हटले आहे, तर इतर काही अधिकाऱ्यांनी पर्याय कायम असून तोडगा निघू शकतो.
भविष्यातील मोहिमांसाठी सहकार्य मिळावे म्हणून पाकिस्तानसह आशिया विभागातील इतर देशांबरोबर अमेरिकेची चर्चा सुरु आहे.याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही अशी शक्यता फेटाळून लावली होती. पाकिस्तानमधून ड्रोन हल्ले करू दिले जाणार नाहीत असेही कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App