फ्रान्समध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर, तब्बल दीडशे शहरांत निदर्शने


विशेष प्रतिनिधी

पॅरिस – दैनंदिन कामासाठी हेल्थ पासची मागणी केली जात असल्याने फ्रान्समधील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे पॅरिससह सुमारे दीडशे शहरात हेल्थ पासच्या विरोधात आंदोलन सुरु झाले आहे.Huge demonstrations in France

फ्रान्सच्या संसदेत लोकप्रतिनिधींनी पास केलेल्या विधेयकानुसार सार्वजनिक ठिकाणी हेल्थ पास आवश्य्क असल्याचे म्हटले आहे. विमानसेवा, संग्रहालय, क्रूझ, चित्रपटगृहे, स्थानिक पर्यटकांसाठी स्पेशल हेल्थ पास घेणे आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक आहे.



या पासनुसार लसीकरण किंवा निगेटिव्ह चाचणी अहवाल किंवा कोविडमधून बरे झालेले प्रमाणपत्र असणे आवश्यसक आहे. तसेच सप्टेंबर मध्यापर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ पास वयस्कर नागरिकांसाठी आवश्य्क आहे.

मात्र ३० सप्टेंबरपासून हा नियम १२ वर्षावरील नागरिकांना लागू केला जाणार आहे. फ्रान्सच्या संसदेने २५ जुलै रोजी रात्री नवीन कायद्यावर शिक्कामोर्तब केले. देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कायदा करण्यात आला.

राजधानी पॅरिस शहरात सध्या ‘कोविड-१९ हेल्थ पास’वरून नागरिक निदर्शने करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनात संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलक यांच्यात धुमश्चआक्री झाली. पॅरिस शहरात सलग तिसऱ्या आठवड्यात आंदोलन सुरू असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

Huge demonstrations in France

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात