हॉलिवूडचा सुपरमॅनही काश्मीर मुद्द्यावर बरळला, इंजस्टिस चित्रपटात काश्मीरचे वादग्रस्त क्षेत्र म्हणून वर्णन, सुपरमॅन-वंडर वुमनची पात्रे अँटी इंडिया, बंदी घालण्याची मागणी


 

अमेरिकेतील लोकप्रिय डिटेक्टिव्ह कॉमिक्स (DC) ने बुधवारी एक नवीन अॅनिमेटेड सुपरमॅन चित्रपट ‘इंजस्टिस’ रिलीज केला आहे. डीसीने या अॅनिमेटेड चित्रपटात सुपरमॅन आणि वंडर वुमनला भारतविरोधी दाखवले आहे. याशिवाय चित्रपटात काश्मीरचे वादग्रस्त क्षेत्र म्हणून वर्णन करण्यात आले आहे.Hollywood Film Controversy DC’s Animated Movie Injustice Calls Kashmir A Disputed Area


प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेतील लोकप्रिय डिटेक्टिव्ह कॉमिक्स (DC) ने बुधवारी एक नवीन अॅनिमेटेड सुपरमॅन चित्रपट ‘इंजस्टिस’ रिलीज केला आहे. डीसीने या अॅनिमेटेड चित्रपटात सुपरमॅन आणि वंडर वुमनला भारतविरोधी दाखवले आहे. याशिवाय चित्रपटात काश्मीरचे वादग्रस्त क्षेत्र म्हणून वर्णन करण्यात आले आहे.

असे म्हटले जातेय की, डीसीने या चित्रपटाद्वारे भारत आणि भारतीय सैन्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या चित्रपटासंदर्भात देशात वाद सुरू झाला आहे. सोशल मीडिया युजर्स पोस्ट शेअर करून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. त्याचबरोबर #AntiIndiaSuperman हॅशटॅगदेखील ट्रेंड करत आहे.

‘इंजस्टिस’ चित्रपटात काश्मीरबद्दल काय?

वास्तविक, ‘इंजस्टिस’ची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका दृश्यात सुपरमॅन आणि वंडर वुमन काश्मीरला जात असल्याचे दाखवले आहे. तेथे त्यांनी भारतीय लष्कराची शस्त्रे आणि तळांचा नाश केला आहे. वादग्रस्त काश्मीरमध्ये शस्त्रे आणि सैन्यासाठी जागा नसल्याचे ते म्हणतात. याशिवाय, सुपरमॅन आणि वंडर वुमन काश्मीरमध्ये कसे जातात आणि लष्कराची शस्त्रे आधी नष्ट करतात हे दाखवले जाते, त्यानंतर काश्मीरला ‘आर्म फ्री झोन’ म्हणून घोषित केले जाते.

सोशल मीडिया वापरकर्ते या चित्रपटासंबंधी पोस्ट शेअर करून DC ला विरोध करत आहेत. एका युजरने लिहिले, “डीसीने चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे.” दुसऱ्याने लिहिले, “DCने या चित्रपटावर बंदी घालावी आणि भारत आणि सैन्याची माफी मागावी.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “या प्रकारानंतर भारतात सर्व डीसी चित्रपटांवर बंदी घातली पाहिजे.” 2018 मध्ये रिलीज झालेल्या टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल -6’ मध्ये काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र म्हणून दाखवण्यात आले होते. मात्र, भारताच्या आक्षेपानंतर निर्मात्यांनी ते दृश्य चित्रपटातून काढून टाकले. आशा आहे की, DCदेखील या चित्रपटातील वादग्रस्त दृश्य काढून टाकेल.

Hollywood Film Controversy DC’s Animated Movie Injustice Calls Kashmir A Disputed Area

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात