व्हाइट हाउसच्या सर्वोच्च अधिकारीपदी गौतम राघवन यांची नियुक्ती


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – भारतीय अमेरिकी राजकीय सल्लागार गौतम राघवन यांची व्हाइट हाउसमधील अध्यक्षीय कार्मिक कार्यालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. राघवन यांच्या नियुक्ती माहिती देताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, राघवन यांनी ‘पीपीओ’त कॅथी यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून काम केले आहे.Gautam Raghwan deputed in White house

ते आता या कार्यालयाचे संचालक असतील. या बदलाने आम्हाला विविध विभागात सजग, प्रभावी, विश्वाकसू कार्यबळ नेमणे शक्य होणार आहे. या नियुक्तीने बायडेन प्रशासनात सर्वोच्च पदावर पोचणाऱ्या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांमध्येर राघवन यांचाही समावेश झाला आहे.



त्यांचा जन्म भारतात झाला असून अमेरिकेतील सिएटल येथे ते लहानाचे मोठे झाले. स्टॅनफोर्ट विद्यापीठाचे ते पदवीधारक आहेत.‘वेस्ट विंगर्स: स्टोरीज फ्रॉम द ड्रीम चेजर, चेंज मेकर्स, अँड होप क्रिएटर्स इनसाइड द ओबामा व्हाइट हाउस’चे संपादक आहेत. राघवन हे समलैंगिक आहेत.

पती व मुलीसह ते वॉशिंग्टनमध्ये ते राहतात. २०११ ते २०१४ पर्यंत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबरोबर आशियाई अमेरिकी आणि प्रशांत द्विपसमुदायादाचे संपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Gautam Raghwan deputed in White house

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात