विशेष प्रतिनिधी
बीजिंग – देशादेशांमध्ये विभाजन आणि संघर्ष निर्माण करण्यासाठी अमेरिका लोकशाहीचा वापर सामूहिक विनाशाचे हत्याeर म्हणून करीत असल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पहिल्या लोकशाही शिखर परिषदेचे आयोजन केले होते.China targets USA on democracy summit
या परिषदेत पंतप्रधान १००पेक्षा जास्त देशांमधील नेत्यांनी सहभाग घेतला होता. चीनचा उदय रोखण्यासाठी त्याला वेगळे करण्यासाठी या परिषदेच्या नावाखाली नवी आघाडी स्थापन करण्याचा डाव अमेरिकेचे असल्याचे चीनचे म्हणणे आहे.
परिषदेसाठी निमंत्रितांच्या यादीतून चीन व रशियाला अमेरिकेने वगळले होते. मात्र तैवानला मात्र निमंत्रण होते. यावरून चीनचा संताप झाला आहे. तैवान हा चीनचा अंतर्गत भाग आहे, असा दावा करणाऱ्या ‘वन चायना’ धोरणाचे हे उघड उल्लंघन आहे, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
चीनमधील लोकशाही ही जनतेची लोकशाही असल्याचे सांगत राष्ट्रीय परिस्थिती आणि वास्तवाचा विचार करून चीन लोकशाहीचा पुरस्कार करतो. चीनी लोकशाही ही अधिक व्यापक, खरा आणि प्रभावी समाजवादी लोकशाही आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. देशातून गरिबीचे संपूर्ण उच्चाटन करीत १.४ अब्ज चीनी नागरिक हे समृद्धीच्या दिशेकडे जात आहे, असा दावाही केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App