बॉम्ब असल्याच्या सूचनेने मलेशियाचे विमान ढाक्यात तातडीने उतरवले


विशेष प्रतिनिधी

ढाका – मलेशियाच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्याने १३५ प्रवाशांना घेऊन जाणारे मलेशियन एअरलाइन्सचे विमान रात्री ढाका विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले. विमानाची अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ती सूचना खोटी असल्याचे निष्पन्न झाले.Due to hoax call plane landed immediatly

क्लालांलपूरहून ढाक्याकडे येणाऱ्या एमएच-१९६ विमानात बॉम्ब असल्याचा एक कॉल मलेशियाहून आला. त्यामुळे संरक्षण यंत्रणा कामाला लागल्या आणि मलेशियन एअरलाइन्सचे विमान हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक वेळेनुसार काल रात्री ९.३८ वाजता तातडीने उतरवण्यात आले.या विमानात १३४ बांगलादेशी आणि १ मलेशियन नागरिक होते. त्यानंतर प्रवासी आणि सामानाची तसेच विमानाची सखोल तपासणी केली असता बॉम्बची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.मलेशियातून आलेल्या एका फोन कॉलमध्ये बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार आम्ही तपासणी केली असता विमानात काहीच आढळून आले नाही. सैनिक कमांडो, हवाई दलाचे बॉम्बनाशक पथक, रॅपिड ॲक्शन बटालियन आणि गुप्तचर विभाग तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी विमानतळावर दाखल झाले आणि कार्यवाही सुरू केली.

Due to hoax call plane landed immediatly

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण