अमेरिकेने भारताला निर्बंधातून सूट द्यावी, रिपब्लिकन खासदाराची मागणी

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होत असल्याने भारताने रशियाकडून ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केली असली तरी ‘काट्‌सा’ कायद्यातून त्यांना सूट दिली जावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर टॉमी ट्युबरव्हिले यांनी केली.Don’t put pressure on India says US senator

या कायद्याच्या आधारे लागू होऊ शकणाऱ्या निर्बंधांतून भारताला वगळावे, अशी अमेरिकेतील अनेक संसद सदस्यांची मागणी आहे.‘एस-४००’ ही रशियाची सर्वाधिक अत्याधुनिक दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.ही यंत्रणा खरेदी करणाऱ्यांवर निर्बंध लागू करण्याचा ‘कास्टा’ कायदा अमेरिकेत मंजूर झाला आहे. या निर्बंधांतून भारताला सूट द्यावी, अशी मागणी ट्युबरव्हिले यांनी केली.
‘भारताबरोबरील अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होत आहेत.

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो आहोत आणि चीनपासून निर्माण झालेल्या धोक्याबाबत चर्चाही केली आहे. त्यामुळे भारताला सूट देण्याची गरज आहे,’ असे ट्युबरव्हिले म्हणाले.तत्कालीन ट्रम्प प्रशासनाने निर्बंधांचा इशारा देऊनही भारताने ‘एस-४००’ ही क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा पाच अब्ज डॉलरचा करार रशियाशी २०१८ मध्ये केला होता.

Don’t put pressure on India says US senator

महत्त्वाच्या बातम्या