पर्यावरणातील बदलांमुळे कॅनडामधील महिलेचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक घोषणा आपण ऐकतो. पण पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे कोणाचा मृत्यू झालेला आपण कधी ऐकलेलं नाही. पण कॅनडामध्ये 70 वर्षाच्या एका महिलेचा वातावरणातील बदलांमुळे मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदलांमुळे मृत्यू झाला अशी नोंद होणारी ही पहिलीच जगातील महिला मानली जात आहे.

Death of a woman in Canada due to climate change

संबंधित मृत महिलेचे नाव अजुनही सार्वजनिक करण्यात आलेले नाहीये. तिला डायबेटिस आणि बीपी हे दोन आजार होते. पण मागील 6 महिन्यांमध्ये एकूण 500 लोकांनी कॅनडामध्ये पर्यावरणातील बदलांमुळे वाढती उष्णता यामुळे आपले प्राण गमावले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या COP-26 या क्लायमेट समिटमध्ये देखील पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आणि एक्स्ट्रीम हिट वेव्हज या विषयांवर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच कॅनडामध्ये ही घटना झालेली आहे.


G20 Summit: पंतप्रधान मोदी आज ब्रिटनला ; हवामान बदल आणि पर्यावरणावरील परिषद;काय आहे परिषदेचा अजेंडा?


अमेरिकेतील द हिल या वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, या महिलेच्या मृत्यूचे कारण डॉक्टरांनी वातावरणातील बदल असे सांगितले आहे.

नेल्सन ब्रिटिश कोलंबिया येथील आपत्कालीन कक्षातील डॉक्टर कायल मेरिट यांनी या महिलेवर उपचार केले होते. त्यांच्या निदान तपशीलांमध्ये त्यांनी स्पष्टपणे असे लिहिले आहे की, मागील 10 वर्षांमध्ये मी प्रथमच हवामानातील बदलामुळे कोणा रुग्णाचा मृत्यू झाला हे ऐकले आहे. ही गोष्ट अतिशय अस्वस्थ करणारी आहे.

पुढे मेरिट म्हणतात, जर आपण फक्त लक्षणाच्या आधारावर उपचार करत राहिलो तर रोगाच्या मुळापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. आणि जर असे केले तर परिस्थिती आणखी बिघडत जाईल. त्यामुळे रोगाच्या मुळापर्यंत जाणे खूप गरजेचे आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत महिलेचा आजार जूनमध्येच कळाला होता. त्यावेळी उष्णता सुरू झाली होती. तापमान 121 फॅरेनहाइट इतके होते. देशातील परिस्थिती इतकी बिघडली होती की फक्त एकट्या ब्रिटीश कोलंबियामध्ये एकूण 500 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. आणि मृत्यूचे हे प्रमाण सामान्य मृत्यूच्या प्रमाणापेक्षा 53% अधिक आहे.

Death of a woman in Canada due to climate change

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात