खळबळजनक : चीनच्या लॅबमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती, लीक झाल्यानेच जगभरात प्रसार, अमेरिकी शास्त्रज्ञाचा संशोधनपर लेख

CoronaVirus Leaked From A Chinese Wuhan Lab And Spread To World A Research Claimed

CoronaVirus Leaked From A Chinese Wuhan Lab : संपूर्ण जगात सध्या कोरोना महामारीमुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. या जागतिक महामारीला सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे आणि ही किती काळ कायम राहील याबद्दल काहीच अंदाज बांधता येत नाहीये. अशा परिस्थितीत विषाणू मानवनिर्मित आहे की, नैसर्गिक आहे की नाही, हे शोधण्यासाठी अनेक देश कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी संशोधन करत आहेत. CoronaVirus Leaked From A Chinese Wuhan Lab And Spread To World A Research Claimed


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : संपूर्ण जगात सध्या कोरोना महामारीमुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. या जागतिक महामारीला सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे आणि ही किती काळ कायम राहील याबद्दल काहीच अंदाज बांधता येत नाहीये. अशा परिस्थितीत विषाणू मानवनिर्मित आहे की, नैसर्गिक आहे की नाही, हे शोधण्यासाठी अनेक देश कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी संशोधन करत आहेत.

कोरोना विषाणूवरील एका नव्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूची निर्मिती चिनी शास्त्रज्ञांनी एका लॅबमध्ये केली होती. येथून हा विषाणू लीक झाला आहे. संशोधानात म्हटलंय की, लॅबनिर्मिती हाच विषाणू आता जगभरात धुमाकूळ घालत आहे.

आंतरराष्ट्रीय सायन्स रिसर्च मॅगझिन ‘अटोमिक सायंटिस्ट’च्या बुलेटिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक निकोलस वेड यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील बीएसएल-2 प्रयोगशाळेत तयार झाला होता, जिथून तो जगभर पसरला. निकोलस वेड यांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला अर्थसाहाय्य देणारी अमेरिकन संस्था इकोहेल्थ एलायन्स ऑफ न्यूयॉर्कचे अध्यक्ष डॉ. पीटर डास्जॅक यांच्या मुलाखतीला आपल्या लेखाचा आधार बनवले आहे.

पीटर डास्जॅक यांनी आपल्या मुलाखतीत पहिल्यांदा खुलासा केला की, वुहान लॅबमध्ये स्पाइक प्रोटीनची रिप्रोग्रामिंग आणि ह्यूमनाइज्ड उंदरांना संक्रमित करणाऱ्या काइमेरिक कोरोना व्हायरस तयार केले जातात. डॉ. डास्जॅक यांनी माहिती दिली की, मागच्या सहा ते सात वर्षांपासून लॅबमध्ये सार्स संबंधित तब्बल 100 नव्या कोरोना विषाणूंचा शोध लावण्यात आला. यापैकी काहींचे मानवीय ऊतींवरही प्रयोग करण्यात आले.

निकोलस वेड म्हणाले की, लॅबमध्ये कोरोना विषाणूची संसर्ग क्षमता वाढवण्यावरही सातत्याने संशोधन सुरू आहे. एवढेच नाही, तर डॉ. डास्जॅक यांना कल्पना होती की, तेथील शास्त्रज्ञांच्या संसर्गापासून बचाव करणाऱ्या प्रणालीत अनेक कमतरता होत्या. परंतु महामारी पसरल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देण्यात आली नाही. उलट विषाणू लीक होण्याच्या शक्यता फेटाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

CoronaVirus Leaked From A Chinese Wuhan Lab And Spread To World A Research Claimed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था