मध्य प्रदेशात चक्क अल्पवयीन मुलालाच दिली कोरोना प्रतिबंधक लस


विशेष प्रतिनिधी

मोरेना – एका अल्पवयीन मुलाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लस घेतल्यानंतर तो मुलगा आजारी पडला आहे. मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्या तील अंबा तालुक्यातील बाग का पुरा येथे ही घटना घडली आहे.Corona vaccine given to minor boy in MP

कमलेश कुशवाह यांचा मुलगा पिल्लूला शनिवारी मोरेना पासून ३५ किलोमीटरवरील एका लसीकरण केंद्रात लस देण्यात आली. त्यानंतर त्याचं डोके दुखू लागले आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घातला.

अंबामधील डॉक्टरांनी या मुलाला उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवलं आहे. भारतात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. तरीही अल्पवयीन मुलाला लस देण्यात आल्याने आश्चार्य व्यक्त करण्यात येत आहे. या मुलावर आता ग्वाल्हेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Corona vaccine given to minor boy in MP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण