वृत्तसंस्था
न्यूयॉर्क – जागतिक तापमानवाढीचे दृश्यह परिणाम आता मानवी आरोग्यावर देखील होऊ लागले आहेत. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया या प्रांतात उष्णतेच्या लाटेमुळे एका सत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तसेच उष्माघातामुळे तिची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या आजाराचे निदान करतानाच येथील स्थानिक डॉक्टरांनी प्रथमच क्लायमेट चेंज (वातावरणातील बदल) या शब्दाचा वापर केला आहे.Climate change pataint found in Canada
कॅनडामध्ये उष्णतेच्या लाटेने आतापर्यंत पाचशेपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेतल्याचे बोलले जाते. इटलीत ग्लास्गो येथे झालेल्या जागतिक संमेलनामध्येही नेमका हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. येथील कुटने प्रांतामध्ये अचानक वणवे भडकल्यानंतर संबंधित महिलेचा अस्थाम्याचा त्रास बळावल्याचे दिसून आले आहे.
या महिलेच्या दुखण्यास जागतिक तापमानवाढ हा घटक कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. कुटने या प्रदेशाचा समावेश ब्रिटिश कोलंबिया प्रांतात होतो. मागील एका वर्षात येथील जंगलांत दीड हजारांपेक्षाही अधिक आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या. उष्णतेच्या लाटेमुळे अन्य आरोग्यविषयक समस्या देखील तीव्र होत चालल्या आहेत. मधुमेह आणि ह्रदयविकारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे डॉ केल मेरिट यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App