इवलाशा भूतानने कोरोनाचा केला खंबीरतेने मुकाबला, तब्बल ९० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण


विशेष प्रतिनिधी

थिम्पू – कोरोनाने साऱ्या जगभर थैमान घातले असताना हिमालयाच्या पर्वतरांगात वसलेल्या छोट्याशा भूतानने मात्र कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळवेल आहे. कोरोनाची व्याप्ती कमी असतानाही या देशाने भारताच्या मदतीने लसीकरणात फार मोठी आघाडी घेतली आहे.Bhutan almost complete its vaccination

भूतानमध्ये आतापर्यंत केवळ २५०६ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. भारताने मार्च महिन्यांत ५.५ लाख डोस दिले आणि त्याचा वापर त्यांनी तातडीने केला.भूतानमध्ये विक्रमी लसीकरणाची नोंद झाली असून या देशाने सात दिवसात ९० टक्के लोकांना लशीचे दोन्ही डोस दिले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून मिळालेल्या मोफत लशींचा भूतानने सात दिवसातच वापर केला.

भूतानची लोकसंख्या सुमारे ८ लाख असून वीस जुलैपासून नागरिकांना लशीचा दुसरा डोस मिळण्यास सुरवात झाली. युनिसेफने देखील कोराना काळात वेगाने लसीकरण मोहीम राबवल्याबद्धल भूतानचे कौतुक केले आहे.

Bhutan almost complete its vaccination

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती