अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जे दीर्घ काळापासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते, ते आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. लुई व्हिटॉन कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे आता जगातील सर्वात श्रीमंत बनले आहेत. फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बर्नार्ड यांचा आता पहिला क्रमांक आहे. bernard arnault becomes the new richest man of the world
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जे दीर्घ काळापासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते, ते आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. लुई व्हिटॉन कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे आता जगातील सर्वात श्रीमंत बनले आहेत. फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बर्नार्ड यांचा आता पहिला क्रमांक आहे.
बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या लुई व्हिटॉन या कंपनीमुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. काही काळापासून त्यांची कंपनी लुई व्हिटॉन सातत्याने चांगला व्यवसाय करत आहे, त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्येही प्रचंड तेजी आलेली आहे. शेअर्समधील तेजीमुळे कंपनीचे मूल्यही झपाट्याने वाढले आहे, कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट यांना लाभ मिळाला आणि ते फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेझोस यांना मागे टाकत पहिल्या स्थानावर आले.
बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या कंपनीचे नाव लुई व्हिटॉन आहे. ही एक फ्रेंच कंपनी आहे, ही कंपनी जगभरात खूप प्रसिद्ध आहे. लुई व्हिटॉन कपडे, सौंदर्य प्रसाधने, फॅशन अॅक्सेसरीज, घड्याळे, परफ्यूम, दागिने, वाइन, पर्स इत्यादी उत्पादने तयार करते. लुई व्हिटॉनची उत्पादने जगभरातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. ही जगातील प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार, जगातील नवीन श्रीमंत व्यक्ती बनलेल्या बर्नार्ड अर्नाल्टची एकूण संपत्ती 19,890 दशलक्ष डॉलर्स आहे. बर्नार्ड यांच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती 19,490 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.
फोर्ब्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, बर्नार्ड यांनी यापूर्वी तीन वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. डिसेंबर 2019, जानेवारी 2020 आणि मे 2021 मध्ये ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत.
bernard arnault becomes the new richest man of the world
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App