चीनसारख्या उभरत्या सुपर पॉवरला रोखण्याची भारताकडे मोठी क्षमता; ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबोट यांचे प्रतिपादन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीन सारखी उभरती सुपर पॉवर दिवसेंदिवस सर्व देशांची संघर्षाची भूमिका घेत असताना भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात त्याचे लवकरात लवकर स्वतःचे अजोड स्थान निर्माण करावे. स्वतःची ताकद वाढवावी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला विशेषतः लोकशाही राष्ट्रांना नव्या सुपर पॉवरच्या विरोधात उभे राहण्यासाठी मदत करावी, अशा भावना ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबोट यांनी व्यक्त केली आहे.India has great potential to thwart emerging superpowers like China; Former Prime Minister of Australia Tony Abbott’s statement

टोनी एबोट सध्या ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान जॅक मॉरिसन यांचे विशेष व्यापारी दूत म्हणून भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी विविध नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. आपल्या भारत भेटीसंदर्भात ऑस्ट्रेलिया टुडे या वेब पोर्टल वर लिहिलेल्या लेखात त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायात भारताची उभरती भूमिका या विषयावर विशेष लेख लिहून मत मांडले आहे.



या ते म्हणतात : हिंद – प्रशांत महासागरात (Indo Pacific) चीन सर्व देशांशी विशेषतः आग्नेय आशियातील देशांची संघर्षाची भूमिका घेत आहे. त्यातून व्यापाराचे असंतुलन आणि संरक्षण विषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. चीन उभरती सुपर पॉवर आहे. आपल्या वर्चस्ववादी धोरणातून चीन छोट्या देशांना अंकित करू पाहत आहे.

भारतासारखा मोठा देश चीनच्या या वर्चस्ववादी धोरणाला परिणामकारक अटकाव करू शकतो. भारताची तेवढी ताकद नक्की आहे. भारताने आपली ताकद वाढवून छोट्या देशांची मदत केली पाहिजे तसेच छोट्या देशांना चीनच्या आक्रमक कह्यात जाण्यापासून रोखले पाहिजे. आंतरराष्ट्रीय समुदायात लोकशाही मानणार्‍या देशांचे प्रभाव टिकून राहण्यासाठी भारत आपली शक्ती वापरू शकतो. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात आपले स्थान अधिकाधिक मजबूत केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यापार वाढण्यास दोन्ही राजकीय व्यवस्था अनुकूल आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण कोणतीही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संबंधित देशातील राजकीय व्यवस्था अनुकूल असेल आणि त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली तर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि मजबूत होण्यास फारसा वेळ लागत नाही, असे निरीक्षण नाही टोनी एबोट यांनी नोंदविले आहे.

India has great potential to thwart emerging superpowers like China; Former Prime Minister of Australia Tony Abbott’s statement

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात