विशेष प्रतिनिधी
सिडनी : वाढत्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाची निम्मी लोकसंख्या म्हणजेच १२ कोटी नागरिक आता लॉकडाउनच्या कक्षेत आले आहेत. सिडनीत लागू केलेला लॉकडाउन आता अन्य भागातही अमलात आणला जात आहे. गेल्या चोवीस तासात ब्रिस्बेन, पर्थ, डार्विन येथेही लॉकडाउन लागू केले आहे.Australia suffering lockdown
ऑस्ट्रेलियात कोरोना शून्य धोरणावर काम केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात नव्याने ३० रुग्ण आढळून आले. मात्र डेल्टा व्हेरियंटच्या संशयावरून निर्बंध वाढवले आहे.दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत जाण्याची भितीने जर्मनीनंतर आता हॉंगकॉंगने ब्रिटनच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.
याशिवाय स्पेनने देखील ब्रिटनला निर्बंधमुक्त यादीतून हटविले आहे. नव्या आदेशानुसार स्पेनमध्ये आता केवळ लस घेतलेली व्यक्ती किंवा कोरोना निगेटिव्ह चाचणी असणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.
अमेरिकेने यूएई आणि चार आफ्रिकी देशांत प्रवास करण्यावरून इशारा दिला आहे. बायडेन सरकारने म्हटले की, यूएईत कोरोना लसीकरण दर चांगला असला तरी रुग्णांची संख्या वाढत आहे. लायबेरिया, मोझांबिक, झांबिया आणि युगांडा येथे कोरोनाने हाहा:कार माजविला असून या चार आफ्रिकी देशात प्रवाशांनी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App