चीनी लस देणार लहान मुलांनाही कोरोनापासून सुरक्षा कवच


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : मुलांना कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी चीनी लशीचे दोन डोस परिणामकारक असल्याचा दावा लॅन्सेट या नियतकालिकाने केला आहे.तीन वर्षांची बालके ते १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलांनी कोरोनाप्रतिबंधक ‘कोरोनाव्हॅक’ या चीनने तयार केलेल्या लशीचे दोन डोस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर प्रतिपिंडे तयार झाल्याचे दिसून आले, असे यातील लेखात म्हटले आहे.chinas vaccine effective for children also

यासाठी चीनमधील झाउआंग काउंटीमधील ५५० मुलांवर दोन टप्प्यात चाचणी केली.सिनोव्हॅक कंपनीने उत्पादन केलेल्या ‘कोरोनाव्हॅक’ या लशीचे दोन डोस घेतलेलेल्या ९६ टक्के मुलांमध्ये ‘सार्स-सीओव्ही-२’ या कोरोनाच्या विषाणूविरोधात प्रतिपिंडे विकसित झाल्याचे आढळले.या लशीमुळे उद्भरवलेले विपरीत परिणामांचा तीव्रता सौम्य व मध्यम स्वरूपाची होती. इंजेक्शन दिलेल्या जागेवर वेदना होणे हे त्यातील एक सर्वसाधारपणे आढळलेले लक्षण होते.या चाचणीसाठी तीन ते १७ वर्षांच्या सुदृढ ५५० मुलांची निवड करण्यात आली होती.

३१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर २०२० या काळात पहिल्या टप्प्यासाठी ७२ मुलांची नोंदणी करण्यात आली. दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर ठेवले होते. पहिल्या टप्प्यातील १०० टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली तर दुसऱ्या टप्प्यात ९७ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली.

chinas vaccine effective for children also

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण