ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात, वाढत्या रुग्णसंख्येने चिंता


विशेष प्रतिनिधी

लंडन – ब्रिटनमध्ये २२ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तिसर्या लाटेची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. देशात काल २०,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून यावर्षीच ३० जानेवारी रोजी २३,१०८ रुग्ण सापडले होते. ब्रिटनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३,२५,१०५ वर पोचली आहे.Briton facing third wave

दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांच्या स्वविलगीकरणावरुन देखील सरकारच्या चिंतेत भर पडत आहे. स्वविलगीकरणामुळे पालक त्रस्त झाले असून शिक्षणावरही परिणाम आहे. त्यामुळे मुलांचे स्वविलगीकरण थांबवण्याची तयारी सरकारकडून होत आहे.



यावर १९ जुलै रोजी निर्णय अपेक्षित आहे. ब्रिटनमध्ये १७ जूनपर्यंत १.७० लाख विद्यार्थी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहत होते. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्याचा नियम सरकारकडून करण्यात आला.

हे विद्यार्थी सरकारी अनुदानित शाळांतील असून त्यांची संख्या २ टक्के एवढी आहे. स्वविलगीकरणाच्या नियमांवरुन पंतप्रधान बोरिस जॉन्सनच्या सरकारवर पालकांचा दबाव वाढत चालला असून सेल्फ आयसोलेशनचा नियम रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे.

Briton facing third wave

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात