गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल ३०० कोटींचे हेरॉईन जप्त


विशेष प्रतिनिधी 

मुंबई – अंमली पदार्थाचा पुरवठा करून भारतातील तरुणाईला शिकार करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे भारतीय तडरक्षक दलाने उधळून लावले आहेत. तटरक्षक दलाने गुजरातजवळ कारवाई करत पाकिस्तानी मच्छीमार बोटीतून ३० किलो हेरॉईन जप्त केले आहे. तसेच बोटीवरील आठ पाकिस्तानी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. All most 30 kg heroine seized from Pakistani ship

त्यांची चौकशी करण्यात येत आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे ३०० कोटी रुपये किंमत आहे. पाकिस्तानी बोटीतून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएसच्या साह्याने तटरक्षक दलाने गुरुवारी ही कारवाई केली.त्यासाठी गुजरातजवळील समुद्रात या बोटीचा शोध घेण्यात आला. भारतीय हद्दीत शिरलेली ही बोट आढळताच तटरक्षक दलाने कारवाई करत बोटीवरून हेरॉईनची प्रत्येकी एक किलोची ३० पाकिटे ताब्यात घेतली. गुजरातच्या किनाऱ्यावर हा साठा उतरवण्यात येणार होता.

मागील महिन्यात लक्षद्वीप बेटांजवळ तटरक्षक दलाने अशीच कारवाई करून तस्करांकडून ३०० किलो हेरॉईन व पाच एके ४७ रायफली आणि एक हजार काडतुसे जप्त केली होती.

All most 30 kg heroine seized from Pakistani ship

इतर बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी