पाकिस्तानात कोरोना लसीचा काळाबाजार: रशियन लसीचे दोन डोस 12 हजार रुपयांना

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानात कोरोना लसीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनची लस घेतली आणि दोन दिवसात ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.पाकिस्तानात रशियाची स्फुटनीक लसीचे दोन डोस घेण्यासाठी 12 हजार पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत.Corona vaccine black market in Pakistan Two doses of Russian vaccine for 12 thousand rupees

12 हजार पाकिस्तानी रुपये म्हणजे 80 डॉलर एवढे होतात. 50 वर्षांवरील सरकारी कर्मचाऱ्याला लस देण्यात येत आहे. लस साठी मोठी रक्कम दिल्यानंतर नागरिकांना रांग लावून लस घ्यावी लागत आहे. दक्षिण कराचीत अनेक लोक लस घेण्यासाठी पैसे घेऊन पोचले. परन्तु तेथे लस संपली होती.


पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर पाकिस्तानातील जनता फिदा; कोरोनाविरोधी लसही भारताचीच घेणार


रशियाच्या लसीवर उड्या

खासगी कंपन्यांना लस खरेदीस सरकरने परवानगी दिली. त्या नंतर या कंपन्या रशियाची स्पुटनिक ही लस खरेदी करत आहेत. कुणीही पैसे देऊन लस घेऊ शकतो, असे सरकारने जाहीर केल्यावर तरुणांच्या उड्या लसीवर पडत आहेत.

लस दरावरून औषध कंपन्या न्यायालयात

प्रारंभी परदेशी लसीवर कर लावला होता. त्यामुळे किंमतीवरून सरकार आणि कंपन्या एकमेकांसमोर आल्या. एका कंपनीने 50 हजार डोस मागविले होते. कंपनी न्यायालयात गेली. अखेर न्यायालयाने कंपनी ठरवेल, ती किंमत आकारण्यास न्यायालयाने परवानगी दिली.

पाकिस्तानात मृत्यूचे तांडव

पाकिस्तानात कोरोनाने कहर केला आहे.आतापर्यत 687908 जणांना कोरोना झाला असून 14478 जणांचा मृत्यू झाला. 3 हजार 568 मृत्यूशी झुंज देत आहेत. ही आकडेवारी एका दिवसातील आहे.

Corona vaccine black market in Pakistan Two doses of Russian vaccine for 12 thousand rupees

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*