नेपाळमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांचा दररोज मृत्यू होत आहे. मात्र, तरीही नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी जोडलेला नवा मित्र चीनने मदत केलेली नाही. त्यामुळे संकटाच्या काळात नेपाळचा जुना मित्र असलेला भारतच मदतीला धावला आहे. लिक्विड ऑक्सिजनचे टॅँकर नेपाळला पाठविले जाणार आहेत.After all, only an old friend will come to the rescue, India will supply liquid oxygen to Nepal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नेपाळमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा दररोज मृत्यू होत आहे. मात्र, तरीही नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी जोडलेला नवा मित्र चीनने मदत केलेली नाही.
त्यामुळे संकटाच्या काळात नेपाळचा जुना मित्र असलेला भारतच मदतीला धावला आहे. लिक्विड ऑक्सिजनचे टॅँकर नेपाळला पाठविले जाणार आहेत.
भारताचे नेपाळमधील राजदूत विजय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की पुढील आठ ते दहा दिवसांत नेपाळला लिक्विड ऑक्सिजनचे टॅँकर पोहोचणार आहेत.
संकटाच्या या काळात भारत नेपाळला मदतीची परंपरा कायम ठेवणार आहे. आत्तापर्यंत भारताने कोरोना प्रतिबंध असलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे २३ लाख डोस नेपाळला पाठविण्यात आले आहेत.
क्वात्रा यांच्या हस्ते नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले महामारीच्या काळात प्रत्येकानेच प्रयत्न करायला हवेत. आपले सर्वांचे एकत्रित प्रयत्न आणि सरकारची मदत यातूनच आपण कोरोनावर मात करू शकतो.
नेपाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा प्रचंड तुडवडा आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू होत असल्याची माहिती मिळाली आहे.
चीनने गेल्या काही वर्षांपासून नेपाळला आपल्या मदतीच्या ओझ्याखाली दाबून टाकले आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीनच्या नेपाळमधील राजदूतच जणू सरकार चालवित असल्याचे चित्र आहे.
मात्र, कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नेपाळला चीनकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टराय यांनी भारताकडे मदतीचे साकडे घातलेआहे.
नेपाळला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. भारताने त्यांना या कठीण काळात ऑक्सिजन , आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा. कोरोनापासून बचावासाठी लागणारं सर्वात मोठे शस्त्र म्हणजेच लिक्विट ऑक्सिजन त्यांच्याकडे नाही.
नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवड्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्सिजनची मागणी दसपटीने वाढली असून, आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करत असल्याचे भट्टाराय यांनी म्हटले आहे.
भारताकडूनही काही प्रमाणात मदत केली जात आहे. सीरमच्या कोव्हिशिल्डचे १० लाख कोरोना लसींचे डोस नेपाळला देण्यात आले आहेत. नेपाळमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. नेपाळमध्ये दररोज ८ हजारांहून अधिक नवे रुग्ण समोर येत असून, १५० ते २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App