माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या भावाकडून अफगाणिस्तानचा विश्वासघात, तालिबानशी केली हातमिळवणी

Afghanistan former president ashraf ghani brother hashmat pledges allegiance to taliban

ashraf ghani brother hashmat pledges allegiance to taliban : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येताच देश सोडून पळून गेलेले माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या बंधूने आता अफगाणिस्तानचा विश्वासघात केला आहे. हशमत गनी यांनी तालिबानशी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. स्थानिक माध्यमांनुसार, हशमत गनी यांनी तालिबान नेता खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेता मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत दहशतवादी गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. Afghanistan former president ashraf ghani brother hashmat pledges allegiance to taliban


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येताच देश सोडून पळून गेलेले माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या बंधूने आता अफगाणिस्तानचा विश्वासघात केला आहे. हशमत गनी यांनी तालिबानशी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. स्थानिक माध्यमांनुसार, हशमत गनी यांनी तालिबान नेता खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेता मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत दहशतवादी गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

अशरफ घनी सध्या आपल्या कुटुंबासह संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आहेत. काबूल न्यूजने बुधवारी अनेक ट्वीटद्वारे माहिती दिली होती की, घनी काबूलमधून पळून गेल्यानंतर अबू धाबी, यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत. यापूर्वी ते शेजारील देश ताजिकिस्तानला गेले होते, पण त्यांच्या विमानाला इथे उतरण्याची परवानगी मिळाली नाही. घनी यांनी नंतर त्यांच्या जाण्याचे समर्थन करत म्हटले की, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. ते देशाच्या भविष्यासाठी विकास योजनांमध्ये योगदान देत राहतील.

अशरफ घनी यांच्यावर गंभीर आरोप

अशरफ घनींवर 15 ऑगस्ट रोजी काबूल तालिबानच्या ताब्यात दिल्यानंतर, चार कार आणि हेलिकॉप्टरमध्ये बरीच रोकड घेऊन देश सोडून पळून गेल्याचा आरोप होता. सोमवारी, रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को म्हणाल्या, “राजवटीचे पतन… हे स्पष्ट करते की घनी अफगाणिस्तानातून कसे पळून गेले.” चार कार पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाचा दुसरा भाग हेलिकॉप्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यात सर्व काही बसत नव्हते आणि काही पैसेही खालीही पडले. मात्र, घनी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी नंतर स्वतःला देशाचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केले. त्यांनी ट्विट केले की, घटनेनुसार जर राष्ट्रपती अनुपस्थित असतील, मरण पावले किंवा राजीनामा दिला तर उपराष्ट्रपती त्यांच्या अनुपस्थितीत कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. सालेह तालिबानबद्दल म्हणाले की, युद्ध अजून संपलेले नाही. असे मानले जाते की ते अजूनही पंजशीर प्रांतात आहेत आणि तालिबानच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, स्थानिक मुजाहिद्दीन बंडखोरांनी काही तालिबान्यांना ठार केले आहे. त्यांनी पुल-ए-हेसर, देह सालाह आणि बानू जिल्हे परत मिळवले आहेत.

Afghanistan former president ashraf ghani brother hashmat pledges allegiance to taliban

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती