सलग दुसऱ्या शुक्रवारी अफगाणिस्तान हादरले : कंधारच्या शिया मशिदीत प्रचंड स्फोट; 37 ठार, 50 हून अधिक जखमी

Afghanistan another Blast In Shia Mosque in kandahar On Friday, 37 Killed, More than 50 injured

Afghanistan another Blast In Shia Mosque in kandahar : अफगाणिस्तानच्या कंधार येथील शिया समुदायाच्या मशिदीवर शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत. हा स्फोट शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झाला. सलग दुसऱ्या शुक्रवारी अफगाणिस्तानात शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आले आहे. Afghanistan another Blast In Shia Mosque in kandahar On Friday, 37 Killed, More than 50 injured


वृत्तसंस्था

कंधार : अफगाणिस्तानच्या कंधार येथील शिया समुदायाच्या मशिदीवर शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत. हा स्फोट शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झाला. सलग दुसऱ्या शुक्रवारी अफगाणिस्तानात शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आले आहे.

पाकिस्तान डेलीने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात मोठ्या प्रमाणात जखमी दिसत आहेत.

गत शुक्रवारच्या स्फोटात 100 हून अधिक ठार

गत शुक्रवारी अफगाणिस्तानच्या कुंदुज शहरात शिया मशिदीत नमाज पढताना मोठा स्फोट झाला. यामध्ये 100 जण ठार झाले होते, तर डझनभर जखमी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, स्फोटाच्या वेळी मशिदीत सुमारे 300 लोक उपस्थित होते. कुंदुजचे उपपोलिस प्रमुख मोहम्मद ओबैदाह म्हणाले की, मशिदीत उपस्थित बहुतांश लोक मारले गेले.

IS ने स्वीकारली होती जबाबदारी, शिया मुस्लिम निशाण्यावर

इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने गत आठवड्यात या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संघटनेने म्हटले की, आमचे लक्ष्य शिया मुस्लिम आणि त्यांच्या धार्मिक संस्था आहेत. आयएसशी संबंधित आमक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने साइट इंटेलिजन्स ग्रुपने याला दुजोरा दिला. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यावर हा देशातील सर्वात मोठा हल्ला होता. कुंदुजमधील संस्कृती आणि माहिती संचालक मतिउल्लाह रौहानी म्हणाले की, हा आत्मघातकी हल्ला होता.

Afghanistan another Blast In Shia Mosque in kandahar On Friday, 37 Killed, More than 50 injured

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात