अब्दुलरजाक गुरनाह या नोबेल विजेत्या साहित्यिकाबद्दल थोडंस


विशेष प्रतिनिधी

गेली तीन दशके अब्दुल रजाक गुरनाह हे निर्वासितांचे भवितव्य, वसाहत वादाचे परिणाम याबाबत सातत्याने, निर्भयपणे व कळकळीने लिखाण करत आहेत.

गुरनाह यांचा जन्म झांजीबार मध्ये १९४८ साली झाला. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी जुलमी राजवटीमुळे देश सोडला व शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी आतापर्यंत 10 कादंबऱ्या तसेच अनेक निबंधांचे लेखन केले आहे. शरणार्थींचे म्हणून आलेले अनुभव सांगण्यासाठी त्यांनी लिखाण सुरू केले होते. त्यांचे लिखाण त्यांचे घर, कुटूंब, समाज आणि त्यांना स्वतः ला भोगावे लागणारे जीवन या विषयावर प्रकाश टाकते. त्यांची पुस्तके विश्वासघात, सत्तेतील लोकांकडून मोडली जाणारी वचने यावर आधारित आहेत. Meomory of departure ही त्यांची पहिली कादंबरी. चांगले जीवन जगण्यासाठी घर सोडलेल्या लोकांच्या भावना ह्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडल्या आहेत.

Abdul Razak Gurnah got Nobel Prize in literature

Paradise ही त्यांची दुसरी कादंबरी. जर्मन वसाहतवाद व राजकीय आक्रमकतेचे परिणाम सांगणारी होती. द लास्ट गिफ्ट (२०११), बाय द सी (२००१) या कादबऱ्या इंग्लंडमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या शरणार्थीबाबत आहेत. या पुस्तकांची निवड बुकर पुरस्कार व टाइम्स बुक प्राईज इन फिक्शन साठी झाली होती.


Nobel Prize 2021 : अब्दुलरझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर, शरणार्थींच्या स्थितीचे केले वास्तव चित्रण


एखादा माणूस भुतकाळ खरेच मागे टाकू शकतो का? आणि स्वतःची ओळख बनवू शकतो का? या विषयावर त्यांचे लिखाण प्रकाश टाकते. आपल्या लिखाणातून ते अश्या लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकतात ज्यांचे अनुभव एरवी कधीच उजेडात आले नसते. ते आपल्या लिखाणातून दुकानदार, वसाहतीतील सैन्यात असलेले स्थानिक सैनिक, विद्यार्थी, शरणार्थींचे जीवन दाखवतात व प्रत्येक माणूस महत्वाचा व लक्षात ठेवण्यासारखा असतो हे स्पष्ट करतात. त्यांच्या लेखनात वसाहतवादाचे परिणाम, संस्कृती, व निर्वासितांच्या भवितव्याचे खरे चित्र दिसते.

साहित्यिक योगदानाकरिता नोबेल पारितोषिक घेणारे ते सहावे अफ्रिकन वंशाचे लेखक आहेत. सध्या ते दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये राहतात. नोबेल पारितोषिकबाबत फोन आल्यावर ते म्हणाले “मला खुप उत्साह आणि आनंद वाटत आहे.” न्यूरोर्क टाइमस ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘तुमचं जगातील अस्तित्व संपुष्टात येणार हा विचार मला नेहमी लिखाणासाठी प्रेरणा देत असतो.’

Abdul Razak Gurnah got Nobel Prize in literature

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण