अमेरिकेत ४० हजार अफगाण निर्वासित आश्रयाला, अन्य देशांपेक्षा घेतली आघाडी


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील सुटका मोहिम सुरु झाल्यानंतर १७ ऑगस्टपासून आतापर्यंत ६० हजार नागरिकांनी अमेरिकेत प्रवेश केला असल्याची माहिती येथील सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. यापैकी १७ टक्के अमेरिकी नागरिक असून उर्वरित अफगाण नागरिक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.40 thousand Afghanis stayed in USA

आणखी काही हजार जणांना अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. यातील अनेक जण सध्या तुर्कस्तान, कतार आणि इतर काही देशांमध्ये आहेत.दरम्यान राजधानी काबूलमध्ये रक्तपात टाळण्यासाठीच मी १५ ऑगस्टला देश सोडून निघून गेलो, असा दावा अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.



आपल्या सुरक्षा सल्लागारांनीच देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता, असेही त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. लाखो डॉलरची संपत्ती घेऊन पळून गेल्याचे घनी यांच्यावर झालेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तालिबानचा काबूलला विळखा पडला असतानाच घनी देश सोडून पळून गेल्याने जगभरातून त्यांच्यावर टीका झाली होती.

40 thousand Afghanis stayed in USA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात