प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन असल्याने आता यू ट्यूबवर व्हिडीओ बनविणे, कॉमेंट करणे सोपे झाले आहे. पोर्नोग्राफीचे व्हिडीओ टाकणे हा तर काहींचा धंदा आहे. मात्र, यू ट्यूबची याबाबतची आचारसंहिता कडक असून २०१८ पासून आत्तापर्यंत ६.३० कोटी व्हिडीओ आणि तब्बल ७०० कोटी आक्षेपार्ह कॉमेंट हटविण्यात आल्या आहेत.YouTube removes 8.30 crore pornographic videos, 700 crore offensive comments
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन असल्याने आता यू ट्यूबवर व्हिडीओ बनविणे, कॉमेंट करणे सोपे झाले आहे. पोर्नोग्राफीचे व्हिडीओ टाकणे हा तर काहींचा धंदा आहे.
मात्र, यू ट्यूबची याबाबतची आचारसंहिता कडक असून २०१८ पासून आत्तापर्यंत ६.३० कोटी व्हिडीओ आणि तब्बल ७०० कोटी आक्षेपार्ह कॉमेंट हटविण्यात आल्या आहेत. हे सर्व व्हिडिओ आक्षेपार्ह, कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केलेले आणि पोनोग्राफी संबंधित होते.
प्रत्येक १० हजारांपैकी १६ ते १८ व्हिडिओ आक्षेपार्ह असतात, असे युट्यूबकडून सांगण्यात आले आहे. युट्यूबचे सुरक्षा आणि विश्वसनीय टीमचे संचालक जेनिफर ओकॉनर यांनी सांगितले की, युट्यूबकडून राबवली जाणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा महत्त्वाची आहे.
कारण ही यंत्रणा प्राथमिक पातळीवरच ९४ टक्के आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट करत. याशिवायही काही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा कमेंट्स राहतात. आक्षेपार्ह व्हिडिओंची संख्या कमी होत असली, तरी हा महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे.
यापूर्वी प्रति १० हजारांपैकी ६३ ते ७२ व्हिडिओ आक्षेपार्ह असत. आता ही संख्या कमी झाली आहे. मात्र, आक्षेपार्ह कंटेंट हटविण्याचे काम यू ट्यूबकडून सातत्याने चालू असते.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App