विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनमधील महत्त्वाच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कालावधीसाठीचा मार्ग मोकळा करण्यात आला.चीनमध्ये दर दहा वर्षांनी संपूर्ण सरकार बदलते. मात्र, चेअरमन माओ यांच्याएवढा स्वत:चा दर्जा करून घेतलेले जिनपिंग हे या नियमास अपवाद ठरणार आहे.Xi Jinping get another 10 year term
या आधी केवळ माओ आणि त्यांच्या नंतरचे अध्यक्ष डेंग जिओपिंग यांना अतिरिक्त कारकिर्द मिळाली होती. त्यामुळे पक्षाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच अध्यक्षांची कारकिर्द वाढवून देणारा ठराव कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
जिनपिंग यांची दुसरी टर्म पुढील वर्षी संपत आहे. यावेळी त्यांचे इतर सर्व मंत्री निवृत्त होणार आहेत. जिनपिंग मात्र त्या पुढील टर्म आणि कदाचित आजीवन अध्यक्षपदावर राहतील. इतकी अनिर्बंध सत्ता केवळ माओ यांनीच उपभोगली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App