माऊंटबॅटन पेपर्समध्ये दडलय तरी काय? ब्रिटिश सरकार सहा लाख पौंड खर्च करून कोणती रहस्ये लपतेय, पंडीत नेहरूंच्या जीवलग दांपत्याचा पत्रव्यवहार

विशेष प्रतिनिधी

लंडन : भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांच्या पत्नी एडविना यांच्यातील पत्रव्यवहार आणि दोघांच्या डायऱ्या यांचा समावेश असलेल्या माऊंटबॅटन पेपरला गुप्त ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकार सुमारे सहा लाख पौंड खर्च करत आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांचे माऊंटबॅटन दांपत्य अगदी जीवलग मानले जात होते.What’s in the Mountbatten Papers? The British government spent six lakh pounds to hide the secrets, the correspondence of Pandit Nehru’s close couple

भारताच्या फाळणीच्या काळापासून या दोघांचा पत्रव्यवहार आणि डायºया याला माऊंटबॅटन पेपर्स असे म्हटले जात आहे. ब्रिटिश सरकार ही कागदपत्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, ब्रिटिश लेखक अँर्ड्यू लोनी यांनी हे पेपर्स मिळविण्यासाठी न्यायालयनी संघर्ष सुरू केला आहे. हे पेपर्स खुले झाल्यास ब्रिटिश राजघराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल तसेच ब्रिटन, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध धोक्यात येतील अशी भीती सरकारला वाटत आहे.



माउंटबॅटन हे राणी व्हिक्टोरियाचे पणतू होते. राजेशाहीचे कट्टर समर्थक असलेले माऊंटबॅटन हे प्रत्येक अभिमानी राजघराण्याप्रमाणे रॉयल नेव्हीमध्ये होते. त्यांनी दुसºया महायुध्दात नौदलाचे नौदलाचे नेतृत्व केले. ब्रिटीश राजवटीत विविध पदे भूषवली. ते भारताचे शेवटचे व्हाइसरॉयही झाले.

1922 मध्ये दिल्लीत माउंटबॅटन यांना एडविना नावाची तरुणी भेटली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या दोघांचेही इतर अनेकांशी अफेअर असल्याचा दावा केला जातो. माउंटबॅटन जोडप्याचे लग्न हे काही गुपित नव्हते. मग, ब्रिटिश सरकार काय लपवू पाहत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

लेडी माउंटबॅटन यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू होते. लेडी माऊंटबॅटन यांनी नेहरूंना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, आज सकाळी तुम्हाला तेथून निघून जाताना पाहून मला वाईट वाटते. तू मला एका विचित्र शांततेत सोडून गेलास. कदाचित,तुलाही माझ्यामुळे हेच जाणवत असेल. त्यावर पंडीत नेहरू यांनी उत्तर दिले आहे की जीवन भयानक आहे.

माउंटबॅटन राजघराण्यातील एक अतिशय प्रभावशाली सदस्य, ड्यूक आॅफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिपचे मामा होते. प्रिन्स चार्ल्स यांच्या वडीलांशी त्यांचे जवळचे संबंध होते. प्रिन्स चार्ल्सच्या वैयक्तिक आयुष्यात माउंटबॅटनने खूप मोठी भूमिका बजावली असे मानले जाते. तत्कालीन मैत्रीण कॅमिला पार्कर बॉल्ससोबतचे त्यांचे अफेअर असो किंवा डायनासोबतचे त्यांचे लग्न यामध्ये माऊंटबॅटन यांची भूमिका महत्वाची होती.

ब्रिटिश राजघराणे प्रेमाने माऊंटबॅटन यांना अंकल डिकी म्हणत असे. मात्र, याच अंकल डिकीच्या डायरीतून खळबळ उडेल, असे कुटुंबातील कोणाला वाटले असेल? माउंटबॅटन यांचे विचार जगापासून लपविण्यासाठी ब्रिटिश सरकारने आत्तापर्यंत ६ लाख पौंड खर्च केले आहेत.ध्या लंडन न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारला न जुमानता माऊटबॅटन यांच्या सर्व खासगी डायऱ्या आणि पत्रे लोकांसाठी खुली करण्याचा निर्णय यामध्ये घेतला जाऊ शकतो.

काही वर्षांंपूर्वी लोनी यांनी माऊंटबॅटन यांच्या कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्याला नकार दिला होता. त्यानंतर लोनी यांनी ब्रिटीशांच्या माहिती स्वातंत्र्य कायद्याचा हवाला दिला आणि सरकारला माउंटबॅटन पेपर्स दाखविण्यास भाग पाडले. त्यापैकी किमान 99.8 टक्के भाग उघड केला. मात्र, इतर भाग प्रसिध्द करण्यास नकार दिला. या प्रसिध्द न झालेल्या कागदपत्रांमध्ये लॉर्ड आणि लेडी माउंटबॅटन यांच्या डायरी आणि दोघांमधील काही पत्रव्यवहाराचा समावेश आहे.

माऊंटबॅटन दांपत्याला डायरी लिहिण्याची सवय होती. 1942 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपल्या पत्नीला लिहिले होते की, एडविना प्रिये, आयुष्यातील सर्वात कठीण आठवड्यात दोनदा तुला सोडून जावे लागल्याचे मला भयंकर वाटते. मला भीती वाटते, जसे मी तुम्हाला पूर्वी सांगितले होते, तुम्ही नाविकाशी लग्न केले नसावे. मला छान गोष्टी सांगण्याची विशेष आवड नाही आणि मी तुमच्या इतर प्रशंसकांशी स्पर्धा करू शकत नाही. पण मला असे वाटले की मला असे म्हणावे लागेल की मला वाटले की तू खरोखर भव्य आणि खूप गोड आणि प्रेमळ आहेस.

माउंटबॅटन यांनी भारताची फाळणी केली होती. त्यांच्या डायरीतील तपशील उघड होणे ब्रिटनला परवडणारे नाही. नेहरू, मोहम्मद अली जिना, महात्मा गांधी आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा आखणाºया सर सिरिल रॅडक्लिफ यांच्याबद्दल त्यांच्याकडे माउंटबॅटन यांनी काही लिहिलेले असू शकते.

What’s in the Mountbatten Papers? The British government spent six lakh pounds to hide the secrets, the correspondence of Pandit Nehru’s close couple

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात