money in swiss bank : स्विस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये कोरोनाच्या काळातही मोठी वाढ झाली आहे. तब्बल २० हजार कोटींहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये जमा झाली आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने याबाबत माहिती जाहीर केली आहे. स्विस बँकांमध्ये वर्ष २०१९ च्या अखेरीस सुमारे ६ हजार ६०० कोटी रुपये जमा होते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाच्या काळातही त्यात तीन पटींहून अधिक वाढ झाली. स्विस बँकांच्या भारतातील विविध शाखा तसेच इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून २० हजार ७०० कोटीहून अधिक रक्कम जमा झाली. यापैकी ४ हजार कोटी बँक खात्यांमध्ये, ३१०० कोटी इतर बँकांमध्ये तसेच सर्वाधिक १३ हजार ५०० कोटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविले आहेत. ग्राहकांच्या खात्यातील ठेवी मात्र घटल्या आहेत. हे अधिकृत आकडे असून भारतीयांनी दडविलेल्या काळ्या पैशाशी त्याचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. watch indian peoples money in swiss bank increased three times amid Covid pandemic
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App