WATCH : पीएम मोदींसारखे द्विपक्षीय संबंध क्वचितच कोणी निर्माण केले असतील, ते खरे हीरो आहेत; जीएमआर ग्रुपचे चेअरमन श्रीनिवास यांची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था

अथेन्स : अथेन्स येथे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केलेल्या बिझनेस लंचला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात नौवहन , पायाभूत सुविधा, ऊर्जा, यासह विविध क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय आणि ग्रीक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सहभाग होता.WATCH : Hardly anyone has built bilateral relations like PM Modi, he is a real hero; GMR Group Chairman Srinivas’s reaction

दरम्यान, ग्रीसमध्ये पीएम मोदींसोबत जेवण घेतल्यानंतर जीएमआर ग्रुपचे बिझनेस चेअरमन-एनर्जी अँड इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, श्रीनिवास बोम्मीदला म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी जे द्विपक्षीय संबंध निर्माण केले, त्याची देशातील फार कमी लोक कल्पना करू शकतील… खूप कमी लोक समजू शकतील. पंतप्रधान मोदी भारतासाठी अदृश्यपणे मोठा प्रभाव निर्माण करत आहेत.



ते असेही म्हणाले की “पीएम मोदी कुठेही जातात, ते एक सेलिब्रिटी असतात, ते एक हीरो असतात. त्यांच्या स्वागताला बरेच लोक येतात, कारण ते समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतात. ते समाजातील देशाच्या सर्व घटकांची काळजी घेणारे नेते आहेत.”

आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधानांनी नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, औषध उत्पादन , माहिती तंत्रज्ञान डिजिटल पेमेंट आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यात आणि भारत आणि ग्रीसमधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी या उद्योजकांनी बजावलेली भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी उद्योगपतींना भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा लाभ गणेयासाठी आणि भारताच्या विकासगाथेचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित केले.

WATCH : Hardly anyone has built bilateral relations like PM Modi, he is a real hero; GMR Group Chairman Srinivas’s reaction

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात