वृत्तसंस्था
इस्लामाबाद : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नवख्या अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दारुण पराभव करत मोठा उलटफेर करून दाखविला. पाकिस्तानची 286 ही धावसंख्या अफगाणिस्तान अवघे दोन गडी गमावून पार केली. अफगाणिस्तान सारख्या नवख्या संघाने पाकिस्तान सरकार कथित बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधारचा वासिम अक्रम प्रचंड भडकला आणि त्याने पाकिस्तानी टीमचे पुरते वाभाडे काढले. Wasim Akram lashed out at the Pakistani team
रोज आठ – आठ किलो मटन खाता तरी हरता कसे?? फिटनेस कडे कोण लक्ष देणार?? दोन – दोन वर्ष फिटनेस टेस्ट होत नाहीत. खेळाडू आळशी झालेत. मैदानावर ढिल्ले पडलेत, असे संतप्त उद्गार काढून वासिम आक्रमणे पाकिस्तानी टीमचे वाभाडे काढले.
https://twitter.com/T_R_W_G/status/1716534310130581697?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1716534310130581697%7Ctwgr%5Ee1d2dc2d00e75c96a7b8eeea8f2189990869f975%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fsports%2Fworld-cup-2023-afghanistan-beat-pakistan-by-8-wickets-wasim-akram-slams-babar-azam-lead-team-over-fitness-and-drop-catches%2F755733
पीच ओली होती का, कोरडी होती?? ग्राउंड निसरडे होते, असली फालतू कारणे देण्यात मतलब नाही. फक्त दोन विकेट गमावून 286 धावा काढणे ही सोपी गोष्ट नाही. ती अफगाणिस्तानच्या नवख्या टीमने करून दाखवली आणि आपले गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक थंडपणे हे पाहत राहिले, याविषयी वासिम आक्रमणे संताप व्यक्त केला.
रोज आठ – आठ किलो मटन खातात. पाकिस्तानची टीम फिटनेस टेस्टला सामोरीच जात नाही. दोन – दोन वर्षे फिटनेस टेस्ट होत नाही. मिसबा उल हक जेव्हा पाकिस्तानी टीमचा प्रशिक्षक होता, तेव्हा तो खेळाडूंचा आवडायचा नाही. कारण तो फिटनेसला प्राधान्य द्यायचा. फिटनेस असेल तरच तुम्ही मैदानात नीट खेळू शकता. तुम्हाला देशासाठी खेळण्याचे पैसे मिळतात. तुम्ही प्रोफेशनल खेळाडू आहात हे तुम्ही लक्षात घ्यायला नको का??, इथून पुढे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कुठल्याही खेळाडूचा मुलाहिजा न ठेवता फिटनेस टेस्ट कराव्यात आणि त्यात जो उतरेल त्यालाच टीम मध्ये ठेवावे, अशी परखड सूचना वासिम अक्रमने केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App