विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – आयपीओ मार्केटमध्ये होणाऱ्या उलाढालीनुसार यंदाचे वर्ष भारतीय आयपीओसाठी लाभदायक ठरणार आहे. येत्या काही दिवसात जवळपास ७० कंपन्यांन्या आपला आयपीओ आणत आहेत.USA tops in IPO market
भारतीय या वर्षी पहिल्या नऊ महिन्यांत ९.७ बिलियन अमेरिकी डॉलरच्या उत्पन्नासह जगातील दहा टॉप आयपीओ मार्केटमध्ये आपले स्थान मिळवू शकतात. मात्र, ही रक्कम एकूण जागतिक आयपीओ फंडाच्या तुलनेत केवळ ३ टक्के आहे. जी अधिक वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रमुख कन्सल्टसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईवायच्या अहवालानुसार २०२१ च्या जानेवारी-सप्टेंबरच्या कालावधीदरम्यान भारताने ७२ आयपीओ लॉन्च केले होते; तर जागतिक स्तरावर जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान एकूण १ हजार ६३५ आयपीओ लॉन्च करण्यात आले. ही आयपीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आयपीओमधून आलेल्या उत्पन्न लक्षात घेतल्यास यात सर्वोच्च स्थानी अमेरिकेचा क्रमांक लागतो, तर यानंतर चीनच्या शांघाय आणि हॉगकाँगचा क्रमांक लागतो. अहवालानुसार भारत वायटीडी २०२१ मध्ये जागतिक स्तरावर ११ व्या स्थानी राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App