विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – चीनच्या शिनजिआंग प्रांतात उइगर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप असून इतर अल्पसंख्य समुदायांचीही स्थिती फारशी चांगली नसल्याचा अमेरिकेचा दावा आहे. ट्रम्प प्रशासनाप्रमाणेच बायडेन प्रशासनानेही चीनमध्ये धार्मिक स्वातंत्र्यापासून नागरिकांना दूर ठेवले जात असल्याचा आपल्या वार्षिक अहवालात आरोप केला आहे. USA targets China on communal harmony
चीनबरोबरच इराण, म्यानमार, रशिया, नायजेरिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्येही धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा असल्याचा आरोप ब्लिंकन यांनी केला.
‘चीनमध्ये धार्मिक भावना व्यक्त केल्या तरी गुन्हा नोंदविला जातो. वंशच्छेदाच्या घटना घडल्या आहेत. चीनच्या दडपशाहीमुळे येथील ख्रिस्ती, मुस्लिम, तिबेटी बौद्ध आणि फालुन गाँग या धर्म अथवा पंथाच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे,’ असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी धार्मिक स्वातंत्र्य अहवालावरील भाषणादरम्यान सांगितले.
चीनमध्ये धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा अमेरिकेचा आरोप चीनमधील मुस्लिम नेत्यांनी फेटाळून लावला आहे. रमजान ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसमोर या नेत्यांनी चीनवरील आरोप नाकारले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App