विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अफगाणिस्तानच्या लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेने मागील दोन दशकांमध्ये तब्बल ८३ अब्ज डॉलर खर्च केले पण तेच सैन्य आणीबाणीची वेळ आली तेव्हा काही क्षणांत कोसळून पडले. अफगाणिस्तानचे लष्कर एवढ्या कमी वेळेत तालिबान्यांना शरण कसे आले?USA defeated in Afganistan is very srious thing
हाच प्रश्नस अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे. इराकप्रमाणे येथे लष्करामध्ये लढण्याची जिद्द नव्हती. अमेरिकेला अफगाणिस्तानात स्थायी असे पोलिस दल आणि भक्कम लष्कर उभारण्यात अपयश आले. तालिबान्यांशी दोन हात करण्यासाठी अमेरिकेला स्थानिक पातळी भक्कम असे नेतृत्वही उभे करता आले नाही.परिणामी लष्कराला त्यांचा नेता मिळाला नाही, असे काही लष्करी विश्लेढषक सांगतात.
तालिबानने एकही गोळी न झाडता अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतली. तालिबानने केवळ राजकीय सत्ताच मिळविली नाही तर अमेरिकेने देऊ केलेला शस्त्रसाठा, दारूगोळा आणि हेलिकॉप्टर देखील ताब्यात घेतले आहे. एक लढाऊ विमान देखील आता तालिबान्यांच्या हाती आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App