वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याच्या माध्यमांच्या अहवालांनंतर अमेरिकन काँग्रेसने दावा केला आहे की, हायपरसोनिक शस्त्रे विकसित करणाऱ्या निवडक देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. अमेरिका, रशिया, चीनमध्ये सर्वाधिक प्रगत हायपरसोनिक शस्त्रास्त्र कार्यक्रम असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.US CRS Report says India Among Few Countries Developing Hypersonic Missiles
हायपरसोनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स, जर्मनी आणि जपान हे देश आहेत. कॉग्रेसनल रिसर्च सर्व्हिसचा हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे जेव्हा चीनने अलीकडेच हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी करून अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना धक्का दिला.
भारत रशियासोबत अण्वस्त्रे बनवतोय?
या अहवालात दावा करण्यात आला आहे की, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया एकत्र अण्वस्त्रे बनवत असताना, भारत आणि रशियाही यावर एकत्र काम करत आहेत. मॅक -7 हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस -2’ मध्ये दोन्ही देशांनी एकमेकांना पाठिंबा दिला आहे. यापूर्वी ब्रह्मोस -2 चे काम 2017 मध्ये पूर्ण करायचे होते, परंतु नवीन अहवालानुसार ते 2025 ते 2028 दरम्यान तयार होईल.
भारतात दुहेरी क्षमतेच्या स्वदेशी हायपरसोनिक क्षेपणास्त्रावर काम
कॉग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालात म्हटले आहे की, भारत हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल प्रोग्राम अंतर्गत दुहेरी क्षमतेचे स्वदेशी हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे
आणि जून 2019 आणि सप्टेंबर 2020 मध्ये मॅक 6 ची यशस्वी चाचणीही केली आहे.अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की भारताकडे 12 हायपरसोनिक टनल आहेत, जे मॅक -13 पर्यंतच्या गतीचे परीक्षण करण्यास सक्षम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App